काजोलने रिक्रिएट केला शाहरूख खानचा Met Gala लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले - "किंग अँड क्वीन"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:19 IST2025-05-07T12:18:46+5:302025-05-07T12:19:28+5:30
Shah Rukh Khan & Kajol Met Gala Look: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये किंग खान पहिल्यांदाच उपस्थित राहिला आणि त्याने त्याच्या अद्भुत लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काजोलने रिक्रिएट केला शाहरूख खानचा Met Gala लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले - "किंग अँड क्वीन"
मेट गाला (Met Gala) फॅशन इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी आपल्या स्टाईल स्टेटमेंटने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या इव्हेंटमुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan)चे नाव सतत चर्चेत येत आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये किंग खान पहिल्यांदाच उपस्थित राहिला आणि त्याने त्याच्या अद्भुत लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या मेट गाला २०२५ च्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, शाहरुख खानची जवळची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोल(Kajol)नेही त्याचा लूक रिक्रिएट केला आहे. त्याची एक झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये दिसली.
काजोल आणि शाहरुख खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी ऑनस्क्रीन जोडप्यांमध्ये समाविष्ट आहेत. रिल लाईफ व्यतिरिक्त, दोघेही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात. अशा परिस्थितीत, आता जेव्हा शाहरुख खान पहिल्यांदाच मेट गालामध्ये पोहोचला आणि तेथील त्याचा लूक चर्चेचा विषय बनला आहे, तेव्हा काजोलने यावर दिलेली प्रतिक्रिया योग्य आहे. काजोलने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये काजोलने किंग खानच्या शैलीत तिचा लूक तयार केला आहे. याशिवाय, त्याच्या मेट गाला लूकचा फोटो देखील शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले की, हम्म, या फोटोंमध्ये फरक शोधा.
शाहरुख खान आणि काजोलचे हे फोटो पाहून चाहते खूप उत्साहित दिसत आहेत आणि ते या फोटोंना लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, किंग आणि क्वीन.
सब्यसाचीने तयार केला शाहरुखचा लूक
२०२५ च्या मेट गालामध्ये शाहरुख खानची पहिल्यांदाच हजेरी लावली. पण त्याने त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचे श्रेय पूर्णपणे भारतातील प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीला जाते. हो, त्याने सध्या चर्चेत असलेल्या मेट गालासाठी किंग खानचा रॉयल लूक तयार केला आहे. शाहरुख व्यतिरिक्त, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ, सिद्धार्थ मल्होत्री आणि प्रियांका चोप्रा यांसारखे चित्रपट कलाकार मेट गालामध्ये सहभागी झाले होते.