मेकअप शिवाय ओळखता येते का ही बॉलिवूडची अभिनेत्री, तिला ओळखणेही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 18:28 IST2019-06-01T18:28:22+5:302019-06-01T18:28:51+5:30
चित्रपट व टेलिव्हिजन जगतातील फार कमी स्टार्स आहेत जे मेकअप शिवाय पहायला मिळतात.

मेकअप शिवाय ओळखता येते का ही बॉलिवूडची अभिनेत्री, तिला ओळखणेही झाले कठीण
चित्रपट व टेलिव्हिजन जगतातील फार कमी स्टार्स आहेत जे मेकअप शिवाय पहायला मिळतात. फोटो शेअर करणे तर दुरची गोष्ट आहे. तर काही कलाकार असे आहेत जे मेकअपशिवाय लोकांसमोर येतात. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने असा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीचा विथआऊट मेकअपचा फोटो समोर आला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त काजलने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपले नाव कमवले आहे. मेकशिवाय फोटो शेअर करत काजलने लिहिले की, लोक स्वतःला आपल्या पेक्षा जास्त शोधू शकत नाही. आपण अशा जगात राहतो जिथे लोक बाहेरील सौंदर्यांसाठी वेडे असतात. कारण सोशल मीडियावर सुंदरतेसाठी जास्त वाव दिली जाते. लाखों रुपयांचे कॉस्मेटिक्स वापरली जातात.
काजल पुढे लिहिते की, आत्ममुग्धता सगळीकडे आहे. त्या पंक्तीत आपण स्वतःमध्ये व गर्दीत सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. मेकअप फक्त बाहेरील सौंदर्याला सुंदर बनवते. ते आपल्याला व्यक्ती म्हणून ओळख देतो का? किती योग्य म्हटले आहे की आपण किती चांगले आहोत, असा स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे.
काजल अग्रवालच्या कामाबद्दल सांगायचे तर काजल बॉलिवूड सिनेमा क्वीनचा तमीळ रिमेक पेरिस पेरिसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश अरविंद करत आहेत.