‘सिंघम’ गर्लने शेअर केला बिकिनीतील हॉट लूक, चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:12 AM2019-12-23T11:12:57+5:302019-12-23T11:13:44+5:30

बिकिनी फोटोंशिवाय या व्हॅकेशनमधील तिच्या आणखी काही खास फोटोंनीही चाहत्यांना वेड लावले आहे. 

kajal agarwal bikini photos going viral | ‘सिंघम’ गर्लने शेअर केला बिकिनीतील हॉट लूक, चाहते फिदा

‘सिंघम’ गर्लने शेअर केला बिकिनीतील हॉट लूक, चाहते फिदा

googlenewsNext
ठळक मुद्देकाजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.

‘सिंघम’ या सिनेमात अजय देवगणच्या अपोझिट दिसलेली अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावलीय. होय, काजलने बोल्ड फोटो शेअर केलेत आणि क्षणात ते व्हायरल झालेत. या फोटोत काजल बिकनीत एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसतेय.
काजल सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशल एन्जॉय करतेय. ब्ल्यू कलरच्या बिकिनीमध्ये ती स्विमींग पूलमध्ये मस्ती करताना दिसतेय. बिकिनी फोटोंशिवाय या व्हॅकेशनमधील तिच्या आणखी काही खास फोटोंनीही चाहत्यांना वेड लावले आहे. 


काजल एका बिझनेसमॅनला डेट करत असल्याचे मानले जात आहे. अलीकडे एका मुलाखतीत, 2020 मध्ये लग्न करणार असल्याचे तिने सांगितले होते.

‘खूप आधी माझा एक बॉयफ्रेन्ड होता. पण बिझी शेड्यूलमध्ये आमच्या नात्यात दुरावा आला आणि हे नाते संपुष्टात आले. आता मी लग्नाचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये मी लग्न करणार आहे,’ असे तिने सांगितले होते.


 सूत्रांचे मानाल तर, काजल एका बिझनेसमॅनशी लग्न करणार आहे. काजलच्या आईवडिलांनी तिच्यासाठी हा मुलगा निवडला आहे. हे अरेंज मॅरेज असेल.


काजलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती दोन साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच ती ‘मुंबई सागा’ या सिनेमात झळकणार आहे. काजलने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.


रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण अशा अनेकांसोबत ती दिसली आहे. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये  लक्ष्मी कल्याणम  या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.


 

Web Title: kajal agarwal bikini photos going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.