​कबालीने मदारी पोस्टरची कल्पना चोरली - इरफान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:58 IST2016-06-28T09:28:57+5:302016-06-28T14:58:57+5:30

इरफान खानच्या आगामी ‘मदारी’ चित्रपटावरून रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचं पोस्टरची कल्पना चोरल्याचे इरफान खानने म्हटलं आहे. मात्र यावर आपली काहीच ...

Kabbali stole the idea of ​​Madari poster - Irfan | ​कबालीने मदारी पोस्टरची कल्पना चोरली - इरफान

​कबालीने मदारी पोस्टरची कल्पना चोरली - इरफान

फान खानच्या आगामी ‘मदारी’ चित्रपटावरून रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचं पोस्टरची कल्पना चोरल्याचे इरफान खानने म्हटलं आहे. मात्र यावर आपली काहीच हरकत नसून चाहत्यांनी दोन्ही सिनेमा पाहावेत, असं आवाहनही इरफानने केलं आहे.

‘मला आधी याबाबत काहीच कल्पना नव्हती. आम्ही तर छोटेसे फिल्ममेकर आहोत. पण सुपरस्टार रजनी यांच्या कबाली चित्रपटाचं पोस्टर आमच्या मदारी सिनेमाच्या पोस्टरवरुन प्रेरित असल्याचं मी पाहिलं. आता तुम्हीच दोन्ही पोस्टर पाहा ना. पण त्यात काय झालं. तुम्ही आमचाही सिनेमा पाहा आणि त्याचाही सिनेमा पाहा, असं इरफानने प्रांजळपणे म्हटलं आहे.

दोन्ही चित्रपटाच्या पोस्टरमध्ये साधर्म्य असून मुख्य नायकाचा चेहरा दिसत आहे. तर उंच इमारती त्यांच्या चेहºयावर आडव्या आहेत. मदारी चित्रपटाचे पोस्टर अधिकृत असून, कबालीचं मात्र फॅन्सनी तयार केलेलं असल्याचं म्हटलं जातंय. कबालीची असंख्य पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
रजनीकांतने कबाली चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्यानंतर दोन पोस्टर शेअर केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रजनीने ट्विटरवर ही पोस्टर्स पोस्ट केली होती.

Web Title: Kabbali stole the idea of ​​Madari poster - Irfan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.