Just Go Pagal !! ‘जॉली एलएलबी2’चे हे गाणे ऐकून तुम्हीही व्हाल पागल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 13:02 IST2017-01-04T13:02:46+5:302017-01-04T13:02:46+5:30
WATCH Jolly LLB 2's Go Pagal: Akshay-Huma's Holi song is wild : Jolly LLB 2 : Akshay-Huma's Holi song : ‘जॉली एलएलबी2’चे पहिले गाणे तुम्हा-आम्हाला पाहता येणार आहे. आज या चित्रपटाचे ‘गो पागल’ हे पहिले गाणे रिलीज झाले.

Just Go Pagal !! ‘जॉली एलएलबी2’चे हे गाणे ऐकून तुम्हीही व्हाल पागल..
ब लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’ हा कोर्ट रूम ड्रामा असलेला चित्रपट कधी एकदा येतो, असे प्रेक्षकांना झालेय. अर्थात त्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण ‘जॉली एलएलबी2’चे पहिले गाणे मात्र तुम्हा-आम्हाला पाहता येणार आहे. आज या चित्रपटाचे ‘गो पागल’ हे पहिले गाणे रिलीज झाले.‘गो पागल’ या गाण्यात अक्षय कुमार आणि हुमा कुरैशी होळीचे रंग उधळताना दिसणार आहे. रफ्तार आणि निंदी कौर यांनी हे गाणे गायले आहे.
‘जॉली एलएलबी2’ हा उत्तर प्रदेशात राहणा-या एका मध्यमवर्गीय तरूणाची कथा आहे. जो वकीली करून आपले घर चालवत असतो. त्यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तिला दैनंदिन आयुष्यात भेडसावणारे लहान-मोठे प्रश्न व समस्या यात आपल्याला दिसणार आहे. हुमा कुरैशी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’ हा २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. पहिला चित्रपट अर्थात ‘जॉली एलएलबी’ हिट अॅण्ड रन केसवर आधारित होता. अक्षयच्या चित्रपटातही असाच एखादा कॉन्टोवर्सिअल मुद्दा दिसू शकतो.‘जॉली एलएलबी’ सुभाष कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. तर अर्शद वारसी यात मुख्य भूमिकेत होता.
आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अक्षय कुमारसह अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला अशी स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झालाय आणि सोशल मीडियावर त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. तूर्तास वेळ आहे ती, ‘गो पागल’ होण्याची. तेव्हा पाहा, अक्षय व हुमासोबत ‘गो पागल’ आणि उधळा होळीचे मनमुराद रंग...