केवळ १७ महिन्यांत कॅटरिना कैफचे चार चित्रपट होणार रिलीज; वाचा यादी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 15:47 IST2017-07-27T10:03:07+5:302017-07-27T15:47:57+5:30

एक काळ असा होता की, अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री होती. एकापाठोपाठ एक तिचे चित्रपट सुपरहिट होत ...

In just 17 months Katrina Kaif will release four films; Read list !! | केवळ १७ महिन्यांत कॅटरिना कैफचे चार चित्रपट होणार रिलीज; वाचा यादी!!

केवळ १७ महिन्यांत कॅटरिना कैफचे चार चित्रपट होणार रिलीज; वाचा यादी!!

काळ असा होता की, अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री होती. एकापाठोपाठ एक तिचे चित्रपट सुपरहिट होत होते. परंतु गेल्या काही काळात तिच्या ग्लॅमरला जणू काही दृष्टच लागली. कारण एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरफ्लॉप ठरत गेल्याने कॅटचा करिष्मा काहीसा कमी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आता कॅट पुन्हा एकदा यशाच्या ट्रॅकवर परतण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे कॅट एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम करीत आहे. त्यामुळे केवळ १७ महिन्यांच्या काळात कॅटचे चार चित्रपट रिलीज होणार असल्याने पुन्हा एकदा कॅटची जादू चालण्याची शक्यता आहे. कॅटच्या याच चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणारा हा सविस्तर वृत्तांत...



१) टायगर जिंदा हैं
‘टायगर जिंदा हंै’ या चित्रपटात कॅटरिना तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानसाबेत बघावयास मिळणार आहे. हा एक अ‍ॅक्शनपट असून, २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, कॅट शूटिंगसाठी विदेशात आहे. अब्बाज जफर दिग्दर्शित या चित्रपटातून सलमान-कॅटची जोडी तब्बल पाच वर्षांनंतर एकत्र येणार आहे. 



२) ठग्स आॅफ हिन्दोस्तान
मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या बिग बजेट चित्रपटातही कॅटरिना महत्त्वाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. परंतु कॅटच्या भूमिकेच्या शूटिंगला अजून वेळ आहे. अशात ती तिच्या इतर प्रोजेक्टवर काम करीत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड आतुरता आहे. 



३) शाहरूख खानसोबत चित्रपट
कॅट किंग खान शाहरूखसोबतही चित्रपट करणार आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू केली जाणार आहे. कॅटसोबत चित्रपटात अनुष्का शर्मा हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा लव्हस्टोरीवर आधारित आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिला आॅफर देण्यात आली होती, परंतु तिच्या तारखा मिळत नसल्याने कॅटला ही भूमिका मिळाली. 



४) आयुष शर्माचा डेब्यू चित्रपट
सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अर्थात दबंग सलमान खान त्याला लॉन्च करणार आहे. सध्या अशी चर्चा आहे की, आयुषच्या डेब्यू चित्रपटात त्याची अभिनेत्री कॅटरिना कैफ असेल. सलमान खान त्यासाठी विशेष फिल्डिंग लावत असल्याचेही समजते. वास्तविक या चित्रपटाविषयी अद्यापपर्यंत फारशी चर्चा नाही, परंतु लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात होते की, आयुषला करण जोहर लॉन्च करणार आहे. 

वरील चित्रपटाची यादी नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात जर यामध्ये बदल झाला तर कदाचित यादीत दुरुस्ती होऊ शकेल. 

Web Title: In just 17 months Katrina Kaif will release four films; Read list !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.