ज्युनियर सैफ अली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 10:55 IST2016-08-17T12:26:34+5:302016-08-18T10:55:13+5:30
सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक बॉलिवुड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवुडसोबतच सैफच्या कुटुंबातील सगळेच या पार्टीला उपस्थित होते. ...
.jpg)
ज्युनियर सैफ अली
स फ अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक बॉलिवुड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवुडसोबतच सैफच्या कुटुंबातील सगळेच या पार्टीला उपस्थित होते. सैफसोबत त्याचा मुलगा इब्राहिमदेखील होता. पण फोटोग्राफर्सने त्याचा फोटो काढू नये यासाठी तो चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण अखेर त्याचे काही फोटो फोटोग्राफर्सनी टिपलेच. पण हे फोटो पाहिल्यावर तरुणपणातील सैफचीच आठवण येते. इब्राहिम अगदी सैफसारखाच दिसतो. सैफ सतरा-अठरा वर्षाचा असताना बॉलिवुडमध्ये आला. इब्राहिमदेखील आता साधारण त्याच वयाचा आहे. सैफ त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये जसा दिसत होता, अगदी तसाच अाता इब्राहिम दिसतो. इब्राहिम चित्रपटात आला तर प्रेक्षकांना नक्कीच तो तरुणपणातील सैफची आठवण करून देईल यात काही शंकाच नाही.