अनुष्काच्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा समोर आली तिची डुप्लीकेटचे ज्युलिया मायकल, दोघांमध्ये झाले होते बोलणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:53 PM2021-02-03T13:53:29+5:302021-02-03T13:59:24+5:30

जूलिया माइकेल साल 2019 मध्ये प्रकाशझोतात आली होती. अनुष्का शर्माप्रमाणे ती दिसते अशी तिने एक पोस्ट शेअर केली होती. आम्ही दोघी जुळ्या आहोत, असं ज्युलियानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Julia Michael Anushka Sharma Doppelganger Photos And Goes Viral | अनुष्काच्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा समोर आली तिची डुप्लीकेटचे ज्युलिया मायकल, दोघांमध्ये झाले होते बोलणे बंद

अनुष्काच्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा समोर आली तिची डुप्लीकेटचे ज्युलिया मायकल, दोघांमध्ये झाले होते बोलणे बंद

googlenewsNext

बॉलिवूडचे ट्रेडिंग कपल अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली  यांच्या आयुष्यात गोंडस परीचे आगमन झाले आहे. १ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलीसह फोटो शेअर करत  तिचे नाव वामिका असे जाहीर केले. अनुष्काने शेअर केलेल्या या पोस्टवर टीव्ही कलाकार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे अनुष्का शर्माच्या या पोस्टवर तिची लुक अ लाइक अमेरिकन गायिका ज्युलिया मायकेलनेही शुभेच्छा दिल्या. या सगळ्यामध्ये ज्युलिया मायकेलची कमेंटच लक्षवेधी ठरली.


विशेष म्हणजे अनुष्का शर्माच्या लूक अ लाइक ज्युलिया मायकेलने अनुष्काच्या पोस्टवर केलेल्या कमेंटला आतापर्यंत 3,817अधिक वेळा पसंत केली गेली आहे. या कमेंटलाच अनेकांनी लाईक्स करत पसंती दर्शवली आहे. यापूर्वी जेव्हा अनुष्का शर्माने त्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली होती तेव्हा ज्युलिया मायकेलने तिचे अभिनंदन केले होते.

 

जूलिया माइकेल साल 2019 मध्ये प्रकाशझोतात आली होती. अनुष्का शर्माप्रमाणे ती दिसते अशी तिने एक पोस्ट शेअर केली होती. आम्ही दोघी जुळ्या आहोत, असं ज्युलियानं ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर अनुष्कानं विनोदी रिप्लायदेत म्हटले होते की, हो, मी देखील कधीपासून तुलाच शोधत होते. ज्युलियाचे काही फोटो हुबेहूब अनुष्कासारखे दिसतात. 


ज्युलियाने थेट तिला एका दिवसाठी विराटची पत्नी बनायचे असल्याची इच्छाच अनुष्काला बोलून दाखवली होती. यावर अनुष्का काय रिप्लाय करणार याकडेच खरे तर सा-यांचे लक्ष लागले होते.

 

अनुष्काने ज्युलियाला रिप्लाय देणे टाळले होते. त्यानंतर ज्युलियाच्या कोणत्याही पोस्टवर अनुष्काने रिप्लाय दिले नव्हते. ज्युलिया सोशल मीडियावर सतत एक्टीव्ह असते. तिचे प्रोजेक्टस, फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अगदी आलिशान आयुष्य ती जगते. तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर तुमच्याही ते लक्षात येईलच.

Web Title: Julia Michael Anushka Sharma Doppelganger Photos And Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.