जुही चावलाने शाहरूख खानला बघताच म्हटले होते; ‘हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो दिसतो’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:34 IST2017-09-29T10:00:19+5:302017-09-29T15:34:27+5:30

शाहरूख खानला आज रोमान्सचा किंग असे म्हटले जाते. आजही तरुणी त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. काही तर आजही ...

Juhi Chawla had said while looking at Shahrukh Khan; 'Which Angle Hero Looks' !! | जुही चावलाने शाहरूख खानला बघताच म्हटले होते; ‘हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो दिसतो’!!

जुही चावलाने शाहरूख खानला बघताच म्हटले होते; ‘हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो दिसतो’!!

हरूख खानला आज रोमान्सचा किंग असे म्हटले जाते. आजही तरुणी त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. काही तर आजही शाहरूख त्यांच्या स्वप्नातील राजकुमार समजतात. मात्र जुही चावला यास अपवाद आहे. होय, जुहीने जेव्हा पहिल्यांदा शाहरूखला बघितले होते, तेव्हा ती त्याला बघून हैराण झाली. ती विचार करीत होती की, अखेर तिच्या चित्रपटासाठी याला हिरो म्हणून का निवडले असावे. निर्मात्यांना हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो वाटला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उपस्थित झाले. हा मजेशीर किस्सा शाहरूखच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आहे. त्यावेळी तो ‘फौजी’ या टीव्ही मालिकेत काम करीत होता. त्याची ही मालिका तेव्हा खूप लोकप्रिय होती. तर जुहीने दोन-तीन चित्रपटांमध्ये काम केल्याने तीदेखील चांगलीच नावारूपास आली होती. 

हा किस्सा ‘राजू बन गया जेंटलमॅन’ या चित्रपटादरम्यानचा आहे. जेव्हा या चित्रपटात लीड रोलसाठी शाहरूखचे नाव पुढे आले तेव्हा जुही चांगलीच संतापली होती. ती थेट प्रोड्युसरकडे त्याची तक्रार करायला गेली होती. तिने प्रोड्युसरला विचारले की, तुम्हाला दुसरा हिरो मिळाला नाही काय? जुहीने हा किस्सा स्वत: एका टीव्ही मुलाखतीत सांगितला होता. जुहीने म्हटले होते की, त्यावेळी मी तीन चार चित्रपट केल्याने स्टार बनले होते. चित्रपटाचे प्रोड्युसर विवेक गोस्वामीने त्यावेळी मला त्यांच्या ‘राजू बन गया जेंटलमॅन’साठी विचारले. मी लगेचच त्यांना होकारही दिला. परंतु जेव्हा मी त्यांना हिरोबद्दल विचारले तेव्हा त्यांनी हिरो आमिर खानसारखा दिसत असल्याचे सांगितले. शिवाय तुला याच्याबरोबर काम करायला हवे असेही म्हटले. 



जुहीने सांगितले की, ‘मी आमिरबरोबर काम केले होते. त्यामुळेच हिरो चांगला असेल असा विचार करून मी निर्मात्यांना होकार दिला होता. मात्र जेव्हा मला हिरो शाहरूखविषयी समजले तेव्हा मी नाराज झाली. वास्तविक त्याची टीव्ही मालिका ‘फौजी’ त्याकाळी खूप प्रसिद्ध होती. परंतु मी स्टार असल्याने टीव्ही फारशी बघत नव्हती, मला त्याच्या या मालिकेविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे शाहरूखची भेट घेण्याचा दिवस आला. मी जेव्हा शाहरूखला बघितले तेव्हा हैराण झाल्याचे जुहीने सांगितले. 

पुढे बोलताना जुहीने म्हटले की, शाहरूखला बघताच माझ्या तोंडून शब्द निघाले की, हा माझ्या चित्रपटाचा हिरो आहे? हा कोणत्या अ‍ॅँगलनी आमिर खान दिसतो. किंग खानच्या दिसण्याबाबत जुहीने म्हटले की, त्यावेळी शाहरूख खूपच सडपातळ बांध्याचा तरुण होता. त्याचा रंगही सावळा होता. कपाळावर केस विस्कटलेले होते. मात्र पुढे जेव्हा आम्ही एकत्र काम केले तेव्हा खूपच मजा आली. तो आमचे सर्वांचे मनोरंजन करायचा असेही जुहीने सांगितले. 

Web Title: Juhi Chawla had said while looking at Shahrukh Khan; 'Which Angle Hero Looks' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.