Judwaa-2 New Poster Out : वरुण धवनचा पहा साधाभोळा अन् रंगीला अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:21 IST2017-08-16T13:36:15+5:302017-08-16T19:21:47+5:30

डेविड धवन यांच्या ‘जुडवा-२’चे नवे पोस्टर समोर आले असून, त्यामध्ये अभिनेता वरुण धवनचा ‘जुडवा’ अवतार बरेच काही सांगून जात ...

Judwaa-2 New Poster Out: Varun Dhawan's look is a colorful and colorful avatar! | Judwaa-2 New Poster Out : वरुण धवनचा पहा साधाभोळा अन् रंगीला अवतार!

Judwaa-2 New Poster Out : वरुण धवनचा पहा साधाभोळा अन् रंगीला अवतार!

डेविड धवन यांच्या ‘जुडवा-२’चे नवे पोस्टर समोर आले असून, त्यामध्ये अभिनेता वरुण धवनचा ‘जुडवा’ अवतार बरेच काही सांगून जात आहे. हा चित्रपट १९९७ मध्ये आलेल्या सलमान खान, करिष्मा कपूर आणि रंभा यांच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. दरम्यान पहिल्या पोस्टरमध्ये वरुण एका भूमिकेत लॉन्ग लॉक्स परिधान केलेला दिसत होता. तर दुसºया भूमिकेत सूट परिधान करून दिसत होता. आता या नव्या पोस्टरमध्ये वरुणचा काहीसा रंगीला अवतार समोर आला असून, तो प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. वरुणने हे पोस्टर वडील डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त लॉन्च केले आहे. 

दरम्यान नव्या पोस्टरमध्ये प्रेम (वरुण) चष्मा परिधान करून खूपच साधाभोळा दिसत आहे. तर दुसºया ‘राजा’च्या भूमिकेत तो मस्तीच्या मूडमध्ये बघावयास मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. हे पोस्टर स्वत: वरुणनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. यावेळी वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डेविड धवन यांच्या ६५ व्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर हे आहे त्यांच्या ४३ व्या ‘जुडवा-२’ या चित्रपटातील राजा आणि प्रेमची भूमिका, या दसºयाला डबल धमाका होणार आहे.’ दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर २१ आॅगस्ट रोजी रिलीज केला जाणार आहे. 

डीएनए रिपोर्टनुसार, ‘एका मोठ्या कार्यक्रमात ग्रॅण्ड पद्धतीने चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात वरुणसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू बघावयास मिळणार आहे. मजेशीर बाब म्हणजे चित्रपटात ‘जुडवा’चा स्टार सलमान खानही कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. भाईजान सलमानसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना तापसीने म्हटले होते की, ‘चित्रपटातील शेवटचा सीन आम्ही सलमानसोबत शूट केला आहे. मीच एकमेव अशी होती की, मी कधी सलमानला भेटली नव्हती, शिवाय त्याच्यासोबत कामही केले नव्हते. याच कारणामुळे मी सेटवर इतरांच्या तुलनेत खूप आनंदी होती. 

पुढे बोलताना तापसीने म्हटले की, ‘शूटिंगवेळी मी स्वत:हून सलमानकडे गेली, त्याला माझा परिचय दिला. हॅलो म्हटले आणि त्याच्यासोबत काही फोटो काढले. चित्रपटात राजपाल यादव आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील शूटिंगचे दोन व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये वरुण आणि जॅकलीन एकमेकांना किस करताना दिसत होते. दोघांचा हा सीन्स इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

Web Title: Judwaa-2 New Poster Out: Varun Dhawan's look is a colorful and colorful avatar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.