‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 14:21 IST2016-12-19T14:21:45+5:302016-12-19T14:21:45+5:30

similarities between Jolly LLB and Akshay Kumar’s Jolly LLB 2 : अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ‘जॉली एलएलबी2’ आणि ‘जॉली एलएलबी’ या दोन्ही चित्रपटात ब-याच गोष्टी कॉमन आहेत. काय आहेत या कॉमन गोष्टी...जाणून घेऊ यात...

'Jolly LLB 2' and 'Jolly LLB' are some of these common things ...! | ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!

‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!

ong>अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ‘जॉली एलएलबी2’ म्हणजे २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’चा सीक्वल आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अभिनेता अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता. तर ‘जॉली एलएलबी2’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. हा दोन्ही चित्रपटामधील एक मोठा बदल आहे. पण याशिवाय या दोन्ही चित्रपटात ब-याच गोष्टी कॉमन आहेत. काय आहेत या कॉमन गोष्टी...जाणून घेऊ यात...



महत्त्वाकांक्षी वकील
‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसीने एक महत्त्वाकांक्षी वकील साकारला होता. या वकीलाला येनकेन प्रकारे यशस्वी व्हायचे असते. तो बराच पैसा कमावतो. पण केसेस जिंकण्यात मात्र अपयशी ठरतो. यानंतर केवळ स्वस्त लोकप्रीयता मिळवण्यासाठी बोमन ईराणीविरूद्ध लढायला उभा राहतो. ‘जॉली एलएलबी2’मध्ये सुद्धा अक्षय हेच करताना दिसतोय. ‘जो वकील पैसा वापर कर दे ना वो वकील नहीं होता,’ असा एक संवाद अक्षय ट्रेलरमध्ये फेकताना दिसतोय. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. ती म्हणजे  ‘जॉली एलएलबी’ आणि  ‘जॉली एलएलबी2’ दोन्ही चित्रपटात प्रारंभी दाखलेल्या वकीलाचे नैतिकतेशी काहीही देणेघेणे नाही.  

हिरोला पडते थप्पड
‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसी हा बोमन ईराणीविरूद्ध केस लढण्याऐवजी पैशांनी केसचा निपटारा करू इच्छितो. तेव्हा कौल साहब त्याच्या जोरदार श्रीमुखात लगावतात. असाच एक सीन ‘जॉली एलएलबी2’मध्येही आहे. फरक इतकाच की ‘जॉली एलएलबी2’मध्ये अक्षयचे वडील त्याच्या श्रीमुखात लगावतात. दोन्ही चित्रपटात या एका थप्पडनंतर जॉलीच्या आयुष्यात नवा टर्निंग पॉर्इंट येतो.

चूक उमगते
‘जॉली एलएलबी’चे एक थप्पड अर्शदचे आयुष्य बदलवून टाकते. हाती घेतलेली केस कुठल्याही स्थितीत जिंकायचीच, असा प्रण तो या थप्पडनंतर करतो. ‘जॉली एलएलबी2’चे ट्रेलर बघता यातही असेच काहीसे होते. यात सुद्धा अक्षयला वडिलांच्या एका थप्पडनंतर त्याच्या चुकीची जाणीव होते. यानंतर तो स्वत: केसचा तपास आपल्या हातात घेतो.

मजबूत प्रतिद्वंदी
‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शदचा तेजिंद्र राजपाल (बोमन कपूर)या शहरांतील नामांकित वकीलाशी गाठ पडते. ‘जॉली एलएलबी2’मध्येही अन्नू मलिक अक्षयला आव्हान देताना दिसतोय. ट्रेलरमध्ये अन्नू कपूर अक्षयच्या विरोधात केस लढताना दिसतोय.

न्यायाधीशाची गोष्ट
‘जॉली एलएलबी’मध्ये सौरभ शुक्ला यांनी जस्टीस त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती. कोर्टरूमधील जस्टीस त्रिपाठी आणि जॉली यांच्यातील विनोदी प्रसंग पाहून प्रेक्षकांचे हसून हसून पोट दुखले होते. ‘जॉली एलएलबी2’मध्येही अक्षय आणि न्यायाधीशांमधील विनोदी प्रसंग पे्रक्षकांना हसवणार आहेत.

Web Title: 'Jolly LLB 2' and 'Jolly LLB' are some of these common things ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.