जॉन म्हणतो, अवार्ड शो म्हणजे सर्कस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 22:23 IST2016-03-22T05:23:39+5:302016-03-21T22:23:39+5:30
बॉलिवूड माचो मॅन जॉन अब्राहम याला खासगी अवार्ड शोमध्ये जाणे आवडत नाही. अलीकडे अवार्ड शो म्हणजे सर्कस झालेत. सर्कशीत ...
.jpg)
जॉन म्हणतो, अवार्ड शो म्हणजे सर्कस
ब लिवूड माचो मॅन जॉन अब्राहम याला खासगी अवार्ड शोमध्ये जाणे आवडत नाही. अलीकडे अवार्ड शो म्हणजे सर्कस झालेत. सर्कशीत तशीही प्राण्यांची गरज असते. माझी नाही. अवार्ड शो माझ्यासाठी गंभीरपणे घेण्याचा विषय नाही. मी कधीही कुठल्याही खासगी अवार्ड शोमध्ये जाणार नाही, असे वक्तव्य करून जॉनने सगळ्यांनाच हैरान करून सोडले. अलीकडे एका अवार्ड शोमध्ये रीतेश देशमुख याने जॉनच्या अभिनयावर मोठा विनोद केला होता. येत्या १०-१५ वर्षांतही जॉन अभिनय शिकू शकत नाही, असे रितेश म्हणाला होता. अर्थात जॉन रितेशचा हा विनोद अतिशय खेळाडूपणे घेतला. रितेश माझ्या भावासारखा आहे. त्याच्या बोलण्याचे मी वाईट नाही मानणार, असे जॉन म्हणाला...