'पठाण'करिता जॉन आमची पहिली आणि एकमेव पसंती होती!’ - सिद्धार्थ आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:31 IST2022-11-07T14:30:44+5:302022-11-07T14:31:24+5:30
Pathan Movie : 'पठाण'च्या टीझरमध्ये जॉन अब्राहमने प्रत्येकाला थक्क केलं आहे, त्यात तो शाहरूख खानच्या वैऱ्याची भूमिका करत असल्याचे उघड झालं!

'पठाण'करिता जॉन आमची पहिली आणि एकमेव पसंती होती!’ - सिद्धार्थ आनंद
'पठाण'(Pathan Movie)च्या टीझरमध्ये जॉन अब्राहम(John Abraham)ने प्रत्येकाला थक्क केलं आहे, त्यात तो शाहरूख खान(Shah Rukh Khan)च्या वैऱ्याची भूमिका करत असल्याचे उघड झालं! जॉनला एका अतिशय हटके अवतारात सादर करण्यात आले आहे, हा खलनायक कठोर निर्दयी असून शत्रूच्या संपूर्ण विनाशाची इच्छा ठेवणारा आहे. केवळ जॉनच मोठ्या ताकदीने ही भूमिका साकारू शकतो आणि त्याने पठाणसाठी होकार कळविल्यावर आपण रोमांचित झाल्याचं सिद्धार्थने सांगितलं!
सिद्धार्थ म्हणाला, “पठाणला लार्जर दॅन लाईफ बनवण्यासाठी, आम्हाला त्याच तोडीचा सशक्त खलनायक पाहिजे होता. जो चुकीला माफ करणारा नसेल आणि स्क्रीनवरची अदाकारी सौम्य तरीही दिलखेच झाली पाहिजे! त्यामुळे जॉन अब्राहम डोक्यात ठेवूनच पठाणमधील खलनायक उभा केला.”
तो पुढे म्हणाला की, “तोच (जॉन अब्राहम) आमची पहिली आणि पसंती होता, आणि आम्हाला भूमिका अजरामर करणारा खलनायक पाहिजे होता. शाहरूख खानला रक्तबंबाळ करणारा, नसानसांत प्रतिशोधाचा निखार असलेल्या जॉनला चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आनंद वाटतो. त्याची व्यक्तिरेखा शक्य त्या अंगाने अद्भूत ठरली आहे. स्क्रीनवर पठाणच्या विरुद्ध उभा असलेला जॉन शोभून दिसतो आणि आम्ही त्यांचा प्रतिस्पर्धी ‘लूक’ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा केला आहे. दोन व्यक्तिरेखांमधील विखाराची ज्वाला भलतीच रंगणार आहे.”
पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदी, तमीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे