​जॉन अब्राहम बॉलिवूडचा ‘दी रॉक’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 18:12 IST2016-11-18T18:12:33+5:302016-11-18T18:12:33+5:30

बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमने जीममध्ये घाम गाळून पीळदार शरीर कामविले आहे. या पीळदार ‘मसल्स बॉडी’मुळे जॉनला ‘बॉलिवूडचा हंक’ म्हंटले ...

John Abraham Bollywood's 'The Rock'! | ​जॉन अब्राहम बॉलिवूडचा ‘दी रॉक’ !

​जॉन अब्राहम बॉलिवूडचा ‘दी रॉक’ !

ong>बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमने जीममध्ये घाम गाळून पीळदार शरीर कामविले आहे. या पीळदार ‘मसल्स बॉडी’मुळे जॉनला ‘बॉलिवूडचा हंक’ म्हंटले जाते. आता मात्र जॉनला आणखी एक नवे नाव मिळाले आहे. हे नवे नाव म्हणजे,‘दी राकॅ’. होय, ‘फोर्स 2’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनय देव याने जॉनला हे नवे नाव दिले.  

‘फोर्स 2’ म्हणजे, निर्माता विपूल शाह यांच्या ‘फोर्स’चा सीक्वल. आज शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला. अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स 2’मध्ये जॉन एसीपी यशवर्धनच्या भूमिकेत आहे. अभिनयने या चित्रपटात जॉनने साकारलेल्या जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.  देशातील सर्वोत्कृष्ठ अ‍ॅक्शन स्टार्समध्ये जॉनचा समावेश आहे. भारतातील ‘दी रॉक’ ड्वेन जॉनसन असेच त्याला म्हणावे लागेल.  (हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर ड्वेन डगलस जॉनसन हा ‘दी रॉक’ या नावाने ओळखला जातो.) जॉनने सुरुवातीपासून आपली अ‍ॅक्शन इमेज जपली. धमेंद्राला चाळीस गुंडांशी लढतो आणि आपल्याला ते खरे वाटते. जॉनची अ‍ॅक्शन दृश्येही प्रेक्षकांना अशीच खरी वाटतात. लोकांचा त्यावर विश्वास बसतो,असे अभिनय म्हणाला.

अ‍ॅक्शन किंवा इमोशन साकारणे कठीण आहे. ‘फोर्स 2’मधील कुठल्याही अ‍ॅक्शन दृश्यात तुम्हाला तोच तोपणा दिसणार नाही. कारांची टक्कर, त्यांचे हेवेत उडणे, नायकाने लांब उड्या मारणे अशी अ‍ॅक्शन पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत. म्हणूनच, आम्ही खरी खुरी वाटावी अशी अ‍ॅक्शन दृ्श्ये साकारण्याचा प्रयत्न केलाय. ‘फोर्स 2’मध्ये एकमेकांशी लढणे, गोळीबार आणि पाठलाग या गोष्टी तुम्हाला खºया वाटतील अशा आहेत,हे सांगायलाही अभिनय विसरला नाही.

 

Web Title: John Abraham Bollywood's 'The Rock'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.