इतकी बदलली साऊथची ही बाला; जितेन्द्रच्या या हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:47 PM2020-04-19T16:47:14+5:302020-04-19T16:49:50+5:30

1986 मध्ये ‘दोस्ती दुश्मनी’ या सिनेमातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली.

Jitendra's heroin south actress bhanupriya then and now-ram | इतकी बदलली साऊथची ही बाला; जितेन्द्रच्या या हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!!

इतकी बदलली साऊथची ही बाला; जितेन्द्रच्या या हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!!

googlenewsNext
ठळक मुद्देभानुची मुलगी आता 16 वर्षांची आहे आणि भानु एकटी तिचा सांभाळ करतेय.

साऊथ इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारूपास आलेली अभिनेत्री भानुप्रिया  आज कदाचित लोकांच्या विस्मरणात गेली असावी. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आजही तिचे नाव घेतले जाते. साऊथशिवाय हिंदी चित्रपटातही भानुप्रिया झळकली. 90 च्या दशकात तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.  


 
भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिची चित्रपटात येण्याची कहाणी चांगलीच रंजक आहे. कुठलेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना ती अचानक चित्रपटसृष्टीत आली. शाळेत शिकत असताना एकदिवस भाग्यराजा गुरु तिच्या शाळेत आले. आपल्या चित्रपटासाठी त्यांना एक शाळकरी मुलगी हवी होती. त्यांनी भानुप्रियाला सिलेक्ट केले. पण एका फोटोशूटदरम्यान भानु अगदीच लहान दिसत असल्याचे त्यांना वाटले आणि भानु या चित्रपटातून बाद झाली. यानंतर भानु कधीच शाळेत गेली नाही. कारण मी आता हिरोईन बनणार, हे भानुने शाळेत सांगितले होते. हिरोईन न बनता पुन्हा शाळेत गेली असती तर सगळ्यांनी तिची टर उडवली असती, त्यामुळे शाळेत जाण्याऐवजी भानुने चित्रपटांत कामाचा शोध सुरु केला. यादरम्यान फोटोशूट करण्याचा सपाटा तिने लावला.


 
तिच्या एका फोटोवर भारतीराजा गुरु यांची नजर गेली आणि त्यांनी Pasiyadu या तामिळ सिनेमात भानुला संधी दिली. हा चित्रपट सुरु असतानाच वामसी गुरु यांनी तिला ‘सितारा’साठी साईन केले. हा सिनेमा रिलीज झाला आणि भानु सुपरस्टार बनली. यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही.


 
1986 मध्ये ‘दोस्ती दुश्मनी’ या सिनेमातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत भानुप्रिया झळकली. तिच्या बहुतांश चित्रपटात जितेन्द्र तिचा हिरो होता.


 
इंडस्ट्रीतील आपल्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये तिने सुमारे 150 सिनेमांत काम केले. भानुप्रियाची पर्सनल लाईफही इंटरेस्टिंग आहे. भानुप्रिया यशाच्या शिखरावर असताना भानुप्रिया एनआरआय आदर्श कौशलच्या प्रेमात पडली. आदर्श अमेरिकेत राहायचा म्हणून भानु त्याच्याकडे आकर्षित झाली होती. भानुचे वडिल या लग्नाच्या विरोधात होते. पण तरीही भानुने 14 जून 1998 रोजी आदर्शसोबत लग्न केले. लग्नाच्या पाच वषार्नंतर भानुने एका मुलीला जन्म दिला. पण पुढे दोन वषार्नंतर भानु व आदर्श यांचा घटस्फोट झाला आणि भानु आपल्या मुलीसोबत चेन्नईला परतली.


 
भानुची मुलगी आता 16 वर्षांची आहे आणि भानु एकटी तिचा सांभाळ करतेय. भानुप्रियाची बहीण शांतीप्रिया हिनेही चित्रपटांत काम केले. पण भानुप्रमाणे यश तिला मिळवता आले नाही.

Web Title: Jitendra's heroin south actress bhanupriya then and now-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.