जितेन्द्र, अनिल कपूर यांना ‘राज कपूर पुरस्कार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 18:55 IST2016-04-17T13:25:16+5:302016-04-17T18:55:16+5:30
अभिनेता जितेन्द्र व अनिल कपूर यांना आज दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणारा ‘राज कपूर ...

जितेन्द्र, अनिल कपूर यांना ‘राज कपूर पुरस्कार’
अ िनेता जितेन्द्र व अनिल कपूर यांना आज दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणारा ‘राज कपूर पुरस्कार ’ जाहिर झाला. या पुरस्काराअंतर्गत ७४ वर्षांच्या जितेन्द्र यांना राज कपूर लाईफटाईम कॉन्ट्रीब्युशन अवार्ड आणि ५९ वर्षांच्या अनिल कपूर यांना राज कपूर स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवार्डने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. पाच लाख रुपए रोख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे लाईफटाईम पुरस्काराचे तर तीन लाख रुपए रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह असे स्पेशल कॉन्ट्रीब्युशन पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३० एप्रिलला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.