जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 09:46 AM2023-04-28T09:46:05+5:302023-04-28T10:29:24+5:30

25 वर्षीय अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे.

jiah khan final verdict cbi court sooraj pancholi suicide case rabia khan 10 years of case | जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार?

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार?

googlenewsNext

चित्रपट अभिनेत्री जिया खान (Jiah khan) च्या आत्महत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा (CBI Court) आज म्हणजेच शुक्रवारी निर्णय येणार आहे. या प्रकरणी सीबीआयने चित्रपट अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला आरोपी बनवले आहे. 3 जून 2013 रोजी, अवघ्या 25 वर्षीय चित्रपट अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

जवळपास 10 वर्षांनंतर विशेष न्यायालय शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता जिया खान प्रकरणी अंतिम निकाल देऊ शकते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. जिया खानचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली(Sooraj Pancholi) साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?
सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जुहू पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते आणि तपासादरम्यान, 7 जून 2013 रोजी, जिया खानच्या घरातून पोलिसांना 6 पानांची सुसाइड नोट सापडली होती. यानंतर, 11 जून 2013 रोजी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.


जवळपास एक महिना तुरुगांत राहिल्यानंर १ जुलै २०१३ला सूरज पंचोलीला जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांच्या तपासावर जिया खानची आई राबिया खान समाधानी नव्हत्या. हे हत्येचे प्रकरण असून हत्येचा गुन्हा म्हणून तपास झाला पाहिजे, असे त्यांचं म्हणाणे होते. 2014 मध्ये जियाच्या आईने केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे दिली होती. 2015 मध्ये सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून सूरज पांचोलीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अंतर्गत सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते.

यानंतर जियाची आई राबियाने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि यावेळी या प्रकरणाचा तपास अमेरिकन तपास संस्था एफबीआयकडे देण्याची मागणी केली, परंतु राबिया यांचा हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी २०१९ मध्ये सुनावणी सुरू झाली आणि २० एप्रिल २०२३ रोजी सुनावणी पूर्ण झाली. 


जिया खानने अनेक चित्रपटांमध्ये बड्या स्टार्ससोबत काम केले. जियाने बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'निशब्द', आमिर खानसोबत 'गजनी' आणि अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट 'हाऊसफुल'मध्ये काम केले होते.
 

Web Title: jiah khan final verdict cbi court sooraj pancholi suicide case rabia khan 10 years of case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.