तैमुरला गाडीत पुढे बसलेलं पाहून जेहने पसरलं भोकाड, रडणाऱ्या लेकाला पाहून करीनाने काय केलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:00 PM2024-01-04T17:00:54+5:302024-01-04T17:24:50+5:30

तैमुर आणि जेह लोकप्रिय स्टारकिड आहेत. आतादेखील त्यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

jeh fight for front seat with taimur saif ali khan kareena kapoor sons video viral on social media | तैमुरला गाडीत पुढे बसलेलं पाहून जेहने पसरलं भोकाड, रडणाऱ्या लेकाला पाहून करीनाने काय केलं पाहा

तैमुरला गाडीत पुढे बसलेलं पाहून जेहने पसरलं भोकाड, रडणाऱ्या लेकाला पाहून करीनाने काय केलं पाहा

पटौडी खान ही बॉलिवूडमधील प्रतिष्ठित फॅमिली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने खान कुटुंब कायमच चर्चेत असतं. सध्या चर्चा आहे ती खान कुटुंबातील दोन छोट्या नवाबांची. तैमुर आणि जेहचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते दोघेही लोकप्रिय स्टारकिड आहेत. आतादेखील त्यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सैफ अली खान-करीना कपूरच्या तैमुर आणि जेह या दोन नवाबांची चर्चा रंगली आहे. 

सैफ आणि करीना अनेकदा त्यांच्या फॅमिलीसोबत स्पॉट होतात. तैमुर आणि जेहबरोबर ते अनेक ठिकाणी, पार्टी आणि फंक्शनमध्येही हजेरी लावताना दिसतात. नुकतंच करीना आणि सैफ कुटुंबासह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी स्वित्झर्लंडला गेले होते. इंडियात परतल्यावर त्यांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तैमुर जेहला बाजूला करत पटकन गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसतो. त्यानंतर पुढच्या सीटवर बसण्यासाठी जेह आग्रह करताना व्हिडिओत दिसत आहे. "मी पुढे बसणार" असं म्हणत जेह रडायला लागतो. त्यानंतर करीना त्याला मागच्या सीटवर घेऊन बसते. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन तैमुर आणि जेहचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "त्याला पुढच्या सीटवर बसायचं आहे...सगळी लहान मुलं सारखीच असतात", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "यांची मुलं पण रडताता का", असं म्हटलं आहे. "यांच्याकडे पण अशी मस्ती होते का", अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. "त्याला पण पुढे बसायचं आहे..,बसवलं असतं", असंही म्हटलं आहे. 

तैमुर आणि जेहचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, करीना आणि सैफने २०१२ साली लग्नगाठ बांधली. सैफचं हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर चार वर्षांनी करीनाने तैमुरला जन्म दिला. त्यानंतर २०२१मध्ये त्यांना पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव जेह असं आहे. 

Web Title: jeh fight for front seat with taimur saif ali khan kareena kapoor sons video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.