जयललिता आणि बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 09:36 IST2016-12-05T12:07:49+5:302016-12-06T09:36:56+5:30
वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी भरतनाट्यमचे धडे घेतले. आई संध्या (वेदांती) हिच्या आग्रहाखातर जयललिता यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीत ...

जयललिता आणि बरंच काही
वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी भरतनाट्यमचे धडे घेतले. आई संध्या (वेदांती) हिच्या आग्रहाखातर जयललिता यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं
जयललिता यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला फक्त प्रौढांकरिता (ADULTS ONLY) हे सर्टिफिकेट मिळाले होते. त्यामुळे आपला पहिलाच सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची संधी जयललिता यांना मिळाली नाही. कारण त्यावेळी जयललिता प्रौढ नव्हत्या.
स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करुन खळाळणा-या धबधब्याखाली गाणे गात नाचणा-या जयललिता तमिळ चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या.
पहिल्यावहिल्या तमिळ सिनेमात जयललिता यांनी एका विधवेची भूमिका साकारली होती. राज्य शालांत परीक्षेत टॉप करणा-या मुलीच्या वाट्याला पदार्पणातच अशी भूमिका आली याबाबत त्यावेळी विविध चर्चा रंगल्या.
सिनेकारर्किद बहरत असताना जयललिता या रियल लाइफमध्ये प्रेमातही पडल्या. विवाहित असलेला अभिनेता शोभन बाबू याच्यावर जयललिता लट्टू झाल्या होत्या. प्रेमात त्या इतक्या आकांत बुडाल्या होत्या की घरातून दुर्बिणीतून शोभन बाबूंना पाहत असताना अनेकांनी जयललिता यांना पाहिलं होतं. इतके प्रेम असूनही जयललिता कधीही लग्नबंधनात अडकल्या नाहीत.
मरुधर गोपालन रामचंद्रन ज्यांना प्रेमाने एमजीआर असे म्हटलं जायचे. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी अशी त्यांची ओळख. त्यांनी तीनवेळा तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं. त्यांनी जयललिता यांच्यासह डझनभर सिनेमात काम केलं. इतकेच नाहीतर जयललिता यांना राजकारणात आणण्याचं श्रेयसुद्धा एमजीआर यांनाच जातं.
सर्वाधिक सिल्व्हर ज्युबिली हिटचा रेकॉर्ड जयललिता यांच्या नावावर आहे. जयललिता यांचे 85 पैकी 80 तमिळ सिनेमा सिल्हव्ह ज्युबिली हिट ठरले. तर तेलुगुमध्ये त्यांचे 28 सिनेमांनी सिल्व्हर ज्युबिलीचा यशस्वी टप्पा पार केला. एका हिंदी सिनेमातही जयललिता यांनी काम केलं. याचं नाव होतं इज्जत. हा सिनेमासुद्धा सुपरहिट ठरला.
जयललिता या नवाब पतौडी यांच्या जबरदस्त फॅन होत्या. फक्त पतौडी आणि पतौडी यांना पाहण्यासाठीच दुर्बिण घेऊन क्रिकेट स्टेडिअममध्ये जात असल्याची कबुली खुद्द जयललिता यांनी दिली होती. तसेच नरी कॉन्ट्रक्टर आणि शम्मी कपूर हे जयललिता यांचे क्रश होते.