पुन्हा चढला जया बच्चन यांचा पारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 19:03 IST2016-08-17T13:33:25+5:302016-08-17T19:03:25+5:30
अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांचा पारा बुधवारी पुन्हा एकदा चढला. एका कार्यक्रमादरम्यान मीडिया व फोटोग्राफर्सवर त्या जाम ...

पुन्हा चढला जया बच्चन यांचा पारा!
अ िनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांचा पारा बुधवारी पुन्हा एकदा चढला. एका कार्यक्रमादरम्यान मीडिया व फोटोग्राफर्सवर त्या जाम संतापल्या. या कार्यक्रमादरम्यान जया बच्चन एका ज्येष्ठ महिला पत्रकारांशी बोलत होत्या. याचदरम्यान काही फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले आणि त्यांनी फटाफट क्लिक करणे सुरु केले. फोटाग्राफर्सच्या वारंवार चमकणाºया फ्लॅश लाईटमुळे जयांचा पारा अचानक चढला. मग काय?? ज्येष्ठ पत्रकारासोबतची चर्चा अर्ध्यावर सोडून जयांनी अचानक फोटोग्राफर्सकडे आपला मोर्चा वळवला. काढा, आधी तुम्ही माझे जितके फोटो काढायचे तितके काढून घ्या. त्यानंतर मी बोलले, असे जया फोटोग्राफर्सला उद्देशून म्हणाल्या. जयांचा पारा असा चढलेला पाहून कोण बिचारा फोटोग्राफर यानंतर त्यांचा फोटो काढण्यास धजावेल. मग काय?? फोटोग्राफर्सची क्लिक क्लिक बंद झाली आणि जयाबार्इंचा पाराही शांत झाला.याआधीही अनेकदा मीडियाच्या फोटोग्राफर्सला जया बच्चन यांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे.