"ओरडू नका", जया बच्चन यांनी सगळ्यांसमोरच पापाराझीला दिला दम, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:42 AM2023-12-06T10:42:34+5:302023-12-06T10:43:52+5:30

जया बच्चन यांनी 'द आर्चीज' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी पुन्हा एकदा जया बच्चन त्यांच्यावर ओरडताना दिसल्या.

jaya bachchan shouted to paparazi at the archies special screening agastya nanda debut movie video viral | "ओरडू नका", जया बच्चन यांनी सगळ्यांसमोरच पापाराझीला दिला दम, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

"ओरडू नका", जया बच्चन यांनी सगळ्यांसमोरच पापाराझीला दिला दम, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच जया बच्चन त्यांच्या स्वभावामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पापाराझींवर अनेकदा त्या चिडलेल्या दिसतात. पुन्हा त्यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्या पापाराझींवर ओरडताना दिसत आहेत. 

जया बच्चन यांनी 'द आर्चीज' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा झोया अख्तरच्या या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नातवाचा चित्रपट पाहण्यासाठी जया बच्चन उपस्थित होत्या. 'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगवेळी त्यांनी पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. पण,  यावेळी पुन्हा एकदा जया बच्चन त्यांच्यावर ओरडताना दिसल्या. 'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम पेजवरुन त्यांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी हाक मारताना दिसत आहेत. त्यांचा आवाज ऐकून जया बच्चन यांनी कानावर हात ठेवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर "ओरडू नका" असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोरच पापाराझींना दम दिल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा ट्रोल केलं आहे. 

"मीडिया आणि चाहत्यांचा आदर न करणाऱ्या सेलिब्रिटींना महत्त्व देऊ नका. मीडियाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरच त्यांना त्याची किंमत कळेल," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "अमिताभ सर यांना कसं सांभाळत असतील...", असंही म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने "यांना पाहून मला शाळेतील मुख्याध्यापकांची आठवण येते," असं म्हणत जया बच्चन यांना ट्रोल केलं आहे. 

Web Title: jaya bachchan shouted to paparazi at the archies special screening agastya nanda debut movie video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.