जावेद जाफरीचे लग्न झाले होते या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत, तिने केलीत चार लग्न, दुसरा नवरा आहे प्रसिद्ध गायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 17:50 IST2021-05-24T17:46:46+5:302021-05-24T17:50:47+5:30

एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जावेद जाफरीचे लग्न झाले होते. पण हे लग्न काहीच महिने टिकले. 

javed jaffrey was married to hina fame zeba bakhtiar | जावेद जाफरीचे लग्न झाले होते या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत, तिने केलीत चार लग्न, दुसरा नवरा आहे प्रसिद्ध गायक

जावेद जाफरीचे लग्न झाले होते या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत, तिने केलीत चार लग्न, दुसरा नवरा आहे प्रसिद्ध गायक

ठळक मुद्देजेबाने एक नाही, दोन नाही तर तब्बल चार लग्नं केलीत.

जावेद जाफरीने बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून त्याचे नाव कमावले. पण त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी कधीही बोलणे टाळले. तुम्हाला माहीत आहे का, एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जावेद जाफरीचे लग्न झाले होते. पण हे लग्न काहीच महिने टिकले. 

जावेद जाफरीचे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले असून त्यांना मीजान, अब्बास आणि अल्विरा अशी तीन मुले आहेत. जावेद जाफरीचे हबिबाच्या आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिना या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेली जेबा बख्तियार आहे. हिना या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर सत्य जगासमोर आले होते.

जेबाचे लग्न प्रसिद्ध गायक अदनान सामीसोबत देखील झाले होते. अदनान आणि जेबा यांना एक मुलगा झाला. त्यांचे लग्न केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये ते दोघे विभक्त झाले. तिचे पहिले लग्न सलमान वालियानीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे देखील लग्न फार काळ टिकले नाही. बॉलिवूडमध्ये करियर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली. तिथे तिने सोहेल खान लेगारीसोबत लग्न केले. जेबाने एक नाही, दोन नाही तर तब्बल चार लग्नं केलीत.

Web Title: javed jaffrey was married to hina fame zeba bakhtiar