Javed Akhtar यांचा 'मुस्लिम पर्सनल लॉ'वर आक्षेप; म्हणाले, 'महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क '

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:07 PM2022-12-05T14:07:27+5:302022-12-05T14:12:15+5:30

जावेद अख्तर यांनी 'मुस्लिम पर्सनल लॉ' वरच आक्षेप घेतला आहे. तसेच लॉ आणि संविधान यांच्यामध्ये संविधानालाच प्राधान्य देणार असे म्हणले आहे.

javed-akhtar-says-like-men-women-could-also-have-more-than-one-husband-then-it-is-equality | Javed Akhtar यांचा 'मुस्लिम पर्सनल लॉ'वर आक्षेप; म्हणाले, 'महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क '

Javed Akhtar यांचा 'मुस्लिम पर्सनल लॉ'वर आक्षेप; म्हणाले, 'महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क '

googlenewsNext

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर नेहमी सामाजिक विषयांवर आपली मतं मांडत असतात. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली आहे. आता त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे जे फार चर्चेत आले आहे. जावेद अख्तर यांनी 'मुस्लिम पर्सनल लॉ' वरच आक्षेप घेतला आहे. (Muslim Personal Law)

जावेद अख्तर नक्की काय म्हणाले ?

'कॉमन सिव्हिल कोड बिल' वरुन जावेद अख्तर यांनी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये दिलेल्या नियमांवर आक्षेप घेतला आहे.' या लॉ नुसार जर पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी आहे तर महिलांना का नाही. हे तर समान हक्काच्या विरोधात आहे. महिलांना सुद्धा एका पेक्षा जास्त पती असण्याची अधिकार असला पाहिजे. तरच ती समानता असेल. एकापेक्षा जास्त लग्न करणे संविधानाच्या विरोधात आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

ते पुढे म्हणाले, 'मी कॉमन सिव्हिल कोडचे पालन करतो. मी माझ्या संपत्तीची वाटणी मुलगा आणि मुलीमध्ये समान करेल, त्यात भेदभाव करणार नाही. लॉ नुसार जर घटस्फोट झाला तर पत्नी आणि मुलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देणे बंधनकारक नाही. हे देखील चुकीचे आहे. '

पर्सनल लॉ आणि संविधान दोघांमध्ये संविधानालाच प्राधान्य

विविधतेने नटलेल्या भारतात एकच कायदे लागू केला जाऊ शकतो ? हा एक वादाचा मुद्दा आहे. कोणाचे पर्सनल लॉ असतील तर असतील मात्र पर्सनल लॉ आणि संविधान यामध्ये एकाला निवडायची वेळ आली तर मी कायम संविधानाची निवड करेल.

Web Title: javed-akhtar-says-like-men-women-could-also-have-more-than-one-husband-then-it-is-equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.