जन्माष्टमीला येणार ‘अ फ्लार्इंग जट’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 14:19 IST2016-08-22T08:49:19+5:302016-08-22T14:19:19+5:30

 टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ मधील सर्व गाणी जवळपास आऊट करण्यात आली ...

Janmashtami will come 'A Flying Jat'! | जन्माष्टमीला येणार ‘अ फ्लार्इंग जट’ !

जन्माष्टमीला येणार ‘अ फ्लार्इंग जट’ !

 
ायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ मधील सर्व गाणी जवळपास आऊट करण्यात आली आहेत. यातील ‘टुटा जो तारा’,‘बीट पे बुट्टी’ या गाण्यांवर चक्क सेलिब्रिटीही थिरकतांना दिसत आहेत.

आता सर्वजण चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. चांगले / वाईट, निसर्ग / प्रदुषण असा दैनंदिन जीवनातील संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आलेला आहे. हा एक सुपरहिरो चित्रपट आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, धम्माल यांचे सुपरहिट समीकरण म्हणजे ‘अ फ्लार्इंग जट’ आहे.

दिग्दर्शक रेमो म्हणतात,‘ नेहमी वाईटावर चांगल्याचा विजय होत असतो. त्यामुळे आम्ही लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची भावना कमी करून त्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी करणार आहोत. श्रीकृष्णाचा जन्म झालेल्या ‘श्रीकृ ष्ण जन्माष्टमी’ निमित्त आम्ही चित्रपट रिलीज करणार आहोत.’ 

Web Title: Janmashtami will come 'A Flying Jat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.