Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:52 PM2022-11-04T17:52:25+5:302022-11-04T17:57:19+5:30

Mili Movie Review in Marathi : जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा 2019 साली रिलीज झालेल्या मुथुकुट्टी जेवियर यांच्याच ‘हेलेन’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.

Janhvi Kapoor Sunny Kaushal Mili Movie Review In Marathi | Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा

Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा

googlenewsNext

-रंजू मिश्रा
 
कलाकार : जाह्नवी कपूर, सनी कौशल, मनोज पाहवा, संजय सूरी, हसलीन कौर, राजेश जैस, अनुराग अरोरा
दिग्दर्शक : मुथुकुट्टी जेवियर
शैली :   थ्रिलर
स्टार रेटिंग : 2.5
---------

Mili Movie Review in Marathi :  जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) ‘मिली’ हा सिनेमा आज शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकला. चित्रपटाचं शीर्षक बघून हा जया बच्चनच्या ‘मिली’ सारखा असावा, असा अनेकांचा अंदाज होता. पण ट्रेलर आला आणि हा ‘मिली’ त्या ‘मिली’पेक्षा सर्वार्थाने वेगळा असल्याचं स्पष्ट झालं. जान्हवीचा ‘मिली’ हा 2019 साली रिलीज झालेल्या मुथुकुट्टी जेवियर यांच्याच ‘हेलेन’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटासाठी जेवियर यांना बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा नॅशनल अवार्ड पटकावला होता. याच जेवियर यांनी ‘मिली’ दिग्दर्शित केला आहे.

 कथानक-  डेहराडूनची मिली नौडियाल (जान्हवी कपूर) बीएससी नर्सिंग केल्यानंतर नोकरीसाठी कॅनडात जाण्याची तयारी करत असते. सोबत एका रेस्टॉरंटमध्ये तिची नोकरीही सुरू असते. आपला बॉयफ्रेन्ड समीरने (सनी कौशल) एखादी नोकरी पकडावी आणि सेटल व्हावं, असं तिला वाटत असतं. मिलीचे वडील निरंजन (मनोज पाहवा) एक वीमा एजंट असतात. मिलीने कॅनडात जाऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. अशात मिली तिच्या बॉयफ्रेन्डसोबत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह केसमध्ये फसते आणि तिला वडिलांच्या संतापाचा सामना करावा लागतो. दुसऱ्याच दिवशी मिली तिच्या कामावर निघून जाते. पण याठिकाणी रेस्टॉरंटचा मॅनेजर चुकून तिला फ्रीजरमध्ये बंद करून निघून जातो. फ्रिजर रूमच्या उणे 17 डिग्री तापमानात जीव वाचवण्यासाठी मिलीची धडपड सुरू होते. तिची ही धडपड  पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. 

 दिग्दर्शन - जेवियर यांनी आपल्या ‘हेलन’ची फ्रेम टू फ्रेम कॉपी केली आहे. चित्रपटात येणारं प्रत्येक वळण तुम्हाला थक्क करतं. फर्स्ट हाफचा अर्धा अधिक भाग मिलीचं आयुष्य, तिचं जग दाखवण्यात खर्च होतो. बापलेकीचं नातं, मुलगी बेपत्ता झाल्यावर अगतिक झालेला बाप हे सगळं अगदी संवेदनशीलपणे आणि हळूवारपणे हाताळलं गेलं आहे. मध्यंतरानंतर चित्रपटात खरा रोमांच पाहायला मिळतो. सिनेमॅटोग्राफी शानदार आहे. फ्रिजर रूमधील प्रत्येक फ्रेम अंगावर काटा आणते, ए.आर. रहमानचं संगीत फार काही कर्णमधूर नाही.

अभिनय- जान्हवीचा अभिनय हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. तिचे याआधीचे काही सिनेमे (गुंजन सक्सेना, गुड लक जेरी) बघता एकटीच्या खांद्यावर पेलवणाऱ्याच भूमिका जान्हवी  भूमिका साकारताना दिसतेय. ‘मिली’ हा सिनेमाचा संपूर्ण भार जान्हवीने एकटीने पेलला आहे. या चित्रपटात तिने आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे. फ्रीजर रूममध्ये उणे 17 डिग्री तापमानातील असहाय्य मिली प्रत्येक सीनमध्ये हृदयाला भिडते. तिचा निष्पाप भाव, तिचा अभिनय मन जिंकून घेतो. मनोज पाहवा यांनी एका मध्यवर्गीय पित्याची भूमिका सक्षमपणे साकारली आहे. सनी कौशलच्या वाट्याला फार काहीही आलेलं नाही. सिनिअर कॉन्स्टेबल सतीश रावतची भूमिका साकारणारा अनुराग अरोरा व हसलीन कौर, संजय सूरीने उत्तम काम केलं आहे.

सकारात्मक बाजू - अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू - कथा काहीशी रेंगाळते. विशेषत: फर्स्ट हाफमध्ये. स्क्रिप्टवर आणखी थोडं काम करण्याची गरज होती.
 
थोडक्यात- जान्हवीचा सर्वोत्तम अभिनय पाहण्यासाठी एकदा हा सिनेमा बघायला हरकत नाही.
 

Web Title: Janhvi Kapoor Sunny Kaushal Mili Movie Review In Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.