Janhvi Kapoor : 'मिली' गर्ल जान्हवी कपूरचा नव्या आलिशान घरात गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 17:59 IST2022-12-03T17:21:35+5:302022-12-03T17:59:20+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचं हे घर ६ हजार ४२१ चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे

Janhvi Kapoor : 'मिली' गर्ल जान्हवी कपूरचा नव्या आलिशान घरात गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने नुकतेच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्रीचे काका संजय कपूर (Sanjay Kapoor), काकू महीप कपूर (Maheep Kapoor), चुलत भाऊ हर्षवर्धन कपूर आणि करीना कपूरची मावशी रीमा कपूर जैन यांनी वांद्रे येथील या घरात आयोजित पूजेला हजेरी लावली होती. महीप कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आणि संजय कपूर जान्हवीचे डुप्लेक्स असलेल्या इमारतीच्या बाहेर पोझ देताना दिसत आहेत.
गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती की जान्हवी कपूरने मुंबईतल्या पॉश एरिया असलेल्या वांद्रे येथे तिचा नवीन डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. अभिनेत्रीचा हा डुप्लेक्स फ्लॉट ६४२१ स्क्वेअर फूट कार्पेट एरियासह ८६६९ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. जान्हवी कपूरने आपल्या नवीन घराच्या रजिस्ट्रेशनचं काम १२ ऑक्टोबरला पूर्ण केले होते आणि फक्त रजिस्ट्रेशनसाठी तिने ३.९० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने वांद्रे येथील बंगल्यासाठी ६४ कोटी रुपये मोजले आहेत. या आलिशान डुप्लेक्ससोबत आउटडोअर गार्डन, स्विमिंग पूल आहे.
जुलैमध्ये विकलं होतं जुनं घर
जान्हवी कपूरने यावर्षी जुलै महिन्यात तिचं जुनं घर विकलं होतं. जे ३४५६ स्क्वेअर फूटचं होतं. अभिनेत्रीचं हे घर मुंबईतील जुहू भागात आहे. हे घर तिने ४४ कोटी रुपयांना अभिनेता राजकुमार रावला विकले होते.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं अभिनेत्रीकडे बरेच चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. 'मिस्टर एंड मिसेज माही' या चित्रपट तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ती वरूण धवनसोबत बवाल चित्रपटात दिसणार आहे.