बोनी कपूर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचला होणारा जावई! फॅमिली फोटोत दिसला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:47 IST2025-11-12T16:14:31+5:302025-11-12T16:47:56+5:30
बोनी कपूर यांच्या वाढदिवसाला त्यांचा होणारा जावई आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने हजेरी लावली होती. त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शिखर पहारियाही दिसत आहे.

बोनी कपूर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचला होणारा जावई! फॅमिली फोटोत दिसला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा ११ नोव्हेंबरला वाढदिवस होता. बोनी कपूर यांच्या ७०व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशनही करण्यात आलं. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने मिळून बोनी कपूर यांचा वाढदिवस साजरा केला. बोनी कपूर यांच्या वाढदिवसाला त्यांचा होणारा जावई आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने हजेरी लावली होती. त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शिखर पहारियाही दिसत आहे.
अर्जून कपूरने बोनी कपूर यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एक फॅमिली फोटोदेखील आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्यासोबत अनिल कपूर, संजय कपूर, अर्जुन कपूर, अंशुला कपूर आणि जान्हवी कपूरही दिसत आहे. या फॅमिली फोटोमध्ये शिखर पहारियादेखील आहे. जान्हवीच्या बाजूला शिखर पहारिया उभा असल्याचं दिसत आहे. या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवी आणि शिखर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक इव्हेंटमध्येही ते एकत्र दिसतात. आता शिखरने बोनी कपूर यांच्या वाढदिवसालाच हजेरी लावल्याने लवकरच जान्हवीच्या लग्नाची न्यूज येणार का याबाबत चाहते प्रश्न विचारत आहेत.