जेन गुडइनफ होता, म्हणून प्रिती झिंटाने बदलला ‘तो’ निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 16:22 IST2017-02-03T10:52:55+5:302017-02-03T16:22:55+5:30
बॉलिवूडची डिम्पल गर्ल प्रिती झिंटा हिने बॉलिवूडला राम राम ठोकण्याचा निर्णय जवळपास घेतला होताच. पण थँक्स टू, जेन गुडइनफ. ...

जेन गुडइनफ होता, म्हणून प्रिती झिंटाने बदलला ‘तो’ निर्णय!
ब लिवूडची डिम्पल गर्ल प्रिती झिंटा हिने बॉलिवूडला राम राम ठोकण्याचा निर्णय जवळपास घेतला होताच. पण थँक्स टू, जेन गुडइनफ. जेनमुळे प्रितीने हा निर्णय बदलला. जेन गुडइ़नफ हा कोण, हे आता विचारू नका. जेन हा प्रितीचा लाडका हबी. लॅक्मे फॅशन वीकदरम्यान खुद्द प्रितीनेच हा खुलासा केला.
लग्नानंतर बॉलिवूड कायमचे सोडून संसार करण्याची प्रितीची इच्छा होती. ती म्हणाली, सध्या मी संसार आणि काम यात खूश आहे. खरे तर लग्नानंतर काम न करण्याचा माझा निर्णय पक्का होता. पण मी अशा व्यक्तिशी लग्न केलं, ज्याने मला चित्रपट करण्यासाठी पुन्हा तयार केल. सध्या मी ‘भैय्याजी सुपरहिट’ हा सिनेमा करतेय. याशिवाय तूर्तास तरी माझ्या हातात दुसरा कुठलाही चित्रपट नाहीय.
![]()
प्रिती २०१३ मध्ये शेवटची चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट होता ‘इश्क इन पॅरिस’. प्रितीची स्वत:ची निर्मिती असलेला हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फारसे यश मिळवू शकला नव्हता. यानंतर प्रिती जेन गुडइनफ याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. आता प्रिती लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पुनर्पदार्पण करतेय. याचे दडपण आहे का? असे प्रितीला विचारण्यात आले. यावर तिने नकारार्थी उत्तर दिले. दडपण वगैरे अजिबात नाही. कारण हा चित्रपट माझी निर्मिती नाही. ‘इश्क इन पॅरिस’वेळी मात्र थोडे दडपण होते. कारण तो चित्रपट माझी निर्मिती होती. पण ठीक आहे. शेवटी प्रत्येक व्यक्ती आपल्या चुकांमधूनच शिकते, असे ती म्हणाली.
ALSO READ : सेटवरून का निघून गेली प्रिती ?
अभिषेक प्रितीला म्हणाला, ‘दूर रहो’
प्रिती आपल्या चुकांमधून शिकली. आता मार्गदर्शन करायला प्रितीसोबत जेन सुद्धा आहे. आता जेनच्या सल्लयाने प्रिती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतलीय. आता हा प्रवास तिच्या कुठल्या मुक्कामाला घेऊन जातो, ते बघूच!