‘जग्गा जासूस’ पोस्टर : रणबीर कपूर - कॅटरिना कैफ शहामृगावर बसून कुठे चालले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:55 IST2016-12-20T11:55:11+5:302016-12-20T11:55:11+5:30
अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर ‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्याबाबतीत अधिकृत घडामोडी सुरू झाल्या आहेत. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले-वहिले ...
.jpg)
‘जग्गा जासूस’ पोस्टर : रणबीर कपूर - कॅटरिना कैफ शहामृगावर बसून कुठे चालले?
अ ेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर ‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्याबाबतीत अधिकृत घडामोडी सुरू झाल्या आहेत. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले-वहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. रंजक गोष्ट अशी की, या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ शहामृगावर सवारी करताना दिसतात. आता शहामृग का? हाच प्रश्न आम्हाला सतावतोय!
अत्यंत मजेशीर अशा या पोस्टरवरून हा चित्रपट फु ल आॅन एंटरटेनर असणार असे दिसतेय. पोस्टरमध्ये रणबीर क्वर्की हेअरस्टाईलमध्ये समोर खूप लक्षपूर्वक बघतोय तर कॅटरिनाच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाव आहेत. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये जर कोणी खुश असेल तर ते म्हणजे शहामृग.
पण रणबीर-कॅट एवढे घाबरलेले का आहेत? त्याचे उत्तर पोस्टर पाहून लगेच कळते. त्यांच्या मागे असणारे ग्लाईडर विमान त्यांच्यावर हल्ला करत आहे. आता शहामृग आणि विमानाचा चित्रपटाशी काय संबंध आहे, हे कळण्यास काही मार्ग नाही.
चित्रपटात रणबीर प्रमुख भूमिकेत असून तो त्याच्या वडिलांचा शोध घणारा गुप्तहेर साकारतोय. कॅट त्याची हीरोईन आहे. पूर्वाश्रमीचे प्रेमीयुगुल असेलेले रणबीर-कॅट ऐकमेकांच्या प्रेमांत आकांत बुडालेले असताना या चित्रपटाची शूटींग सुरू झाली होती. नंतर दोघे वेगळे झाल्यामुळे फिल्म लांबणीवर पडली. अखेर पुढील वर्षी ७ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रीतमने या चित्रपटासाठी तब्बल २४ गाणी तयार केली आहेत.
![Jagga Jasoos Poster featuring Ranbir and Katrina]()
‘बर्फी’नंतर अनुराग बसू या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन करतोय. रणबीर-कॅट व्यतिरिक्त यामध्ये अदा शर्माचीसुद्धा महत्त्वाची भूमिका राहणार आहे. सुत्रांनुसार, चित्रपटात गोविंदा आणि शाहरुख खान कॅमिओ करणार आहेत. मग तुम्हाला पोस्टर कसे वाटले हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.