अभिनेत्रीपूर्वी जॅकलीन होती पत्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:43 IST2017-02-05T10:13:03+5:302017-02-05T15:43:41+5:30

आपल्या आवडत्या कलाकारविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही उत्सुक असते. तसेच त्या कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. ...

Jacqueline was a journalist before the actress | अभिनेत्रीपूर्वी जॅकलीन होती पत्रकार

अभिनेत्रीपूर्वी जॅकलीन होती पत्रकार

ल्या आवडत्या कलाकारविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही उत्सुक असते. तसेच त्या कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. मात्र आता जॅकलीनच्या चाहत्यांना ती अभिनेत्री होण्याच्या आधी काय करत असेल असा प्रश्न निर्माण झाला असेल तर, तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण तिने नुकतेच तिच्या आईने तिच्या चाहत्यांच्या या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. त्याचबरोबर जॅकलीनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 
         
        बॉलिवुडची ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रसारमाध्यमांचे मथळ्यांनी आपल्या नावाचा गाजावाजा होणारी जॅकलीन ही पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर जॅकलीनने श्रीलंकेत पत्रकार म्हणून काम देखील केले होते. नुकताच तिच्या आईने तिच्या पत्रकारिता करतानाचा जुना व्हिडिओ जॅकलीनला पाठवून पत्रकारितेच्या दुनियेतील आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर जॅकलीनने देखील हे दिवस अद्याप विसरली नसल्याचे बोलून दाखविले. आईने पत्रकारितेला दिलेला उजाळ्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव अविस्मरणीय असल्याचे जॅकलीन म्हणाली. फिल्डवर टीमसोबत काम करणे हे प्रत्येक दिवशीचे साहसी काम असायचे, अशा शब्दात तिने पत्रकारिता क्षेत्राविषयीची आत्मियता व्यक्त केली. रोज नवीन घडामोडींवर नजर ठवण्याचे काम हेरगिरीसारखे होते, त्यामुळे ते दिवस मी कधीही विसरु शकत नाही, असे जॅकलीनने एका मुलाखतीवेळी सांगितले.
 
         पत्रकारितेच्या क्षेत्रातून मॉडेलिग क्षेत्रात आल्यानंतर २०१६ मध्ये जॅकलीनने मिस युनिवर्सचा ताज पटकाविला होता. अर्थातच मिसयुनिवर्सनंतर जॅकलीनचा बॉलिवूडटचे दरवाजे उघडले होते. दरम्यान जॅकलीनने चित्रपटामध्ये पत्रकारितेची भूमिका करण्याची उत्सुकता देखील बोलून दाखवली. मी पत्रकार म्हणून फिल़्डवर काम केले असल्यामुळे अशा भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला
 

Web Title: Jacqueline was a journalist before the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.