जॅकलिन फर्नांडिसचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, दिसतेय बेली डान्स करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 19:15 IST2019-03-13T19:15:00+5:302019-03-13T19:15:00+5:30
जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, दिसतेय बेली डान्स करताना
'चिट्टीयां कल्लाइया वे...' म्हणत आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सक्रीय असते व या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. इतकेच नाही तर तिचे ग्लॅमरस फोटो व डान्स व्हिडिओ देखील शेअर करत असते. नुकताच तिने एक डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे. मर्डर २ चित्रपटातील आ जरा या गाण्यावर जॅकलिन थिरकताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत सादिका खानदेखील आहे. या व्हिडिओसोबत जॅकलिनने लिहिले की, 'ही तर सुरुवात आहे दबंग रिलोडेड दुबईची. रिहर्सल विथ माय सादिका खान.'
जॅकलिनच्या बेली डान्सचा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखापेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रेस ३' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
मात्र सध्या ती तिच्या आगामी 'ड्राइव्ह' या चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत. या चित्रपटामध्ये जॅकलीनसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.