जॅकलिन फर्नांडिस आहे महागड्या गाड्यांची शौकिन, बीएमडब्ल्यूची किंमत माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:16 PM2024-04-03T15:16:39+5:302024-04-03T15:19:22+5:30

जॅकलिन ही महागड्या गाड्यांची शौकीन आहे.

jacqueline fernandez new bmw i7 electric car worth Rs 2 crore | जॅकलिन फर्नांडिस आहे महागड्या गाड्यांची शौकिन, बीएमडब्ल्यूची किंमत माहिती आहे का ?

जॅकलिन फर्नांडिस आहे महागड्या गाड्यांची शौकिन, बीएमडब्ल्यूची किंमत माहिती आहे का ?

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवला. जॅकलिनला सुरुवातीपासूनच महागड्या गाड्यांची शौकीन आहे. तिच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. महागड्या आणि आलिशान गाड्या चालवणे ही तिची सर्वात मोठी आवड आहे.

जॅकलिनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या बीएमडब्ल्यूची झलक पाहायला मिळत आहे. तिच्या बीएमडब्ल्यूची किंमत तब्बल 1.80 कोटी आहे. ही इलेक्ट्रिक कार केली आहे. जॅकलिनला महागड्या कारची खूप आवड आहे. बीएमडब्ल्यू आय 7 व्यतिरिक्त तिच्याकडे 'हॅमर एच 2', 'मर्सिडीज बेंन्झ' 'आयबॅच एस 500', 'रेंज रोवर', 'बीएमडब्ल्यू 525 डी' आणि 'जीप कॉम्पपास' कार आहेत.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच वैभव मिश्राच्या 'फतेह' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सोनू सूद आणि विजय राजदेखील स्क्रिन शेअर करणार आहेत. तसंच ती 'जीतेगा तो जिएगा' या स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे. शिवाय, जॅकलिन ही लवकरच 'वेलकम टु द जंगल' (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 

Web Title: jacqueline fernandez new bmw i7 electric car worth Rs 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.