"जॅकलिनला सर्व काही माहीत होतं, तरीही...", मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:50 PM2024-01-31T13:50:10+5:302024-01-31T13:50:28+5:30

Sukesh Chandrashekhar : २०० कोटी मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीचा मोठा दावा, म्हणाले - जॅकलिनने त्याच्या पैशाचा...

Jacqueline Fernandez know everything about sukesh chandrashekhar 200cr money laundring case said ED | "जॅकलिनला सर्व काही माहीत होतं, तरीही...", मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीचा मोठा खुलासा

"जॅकलिनला सर्व काही माहीत होतं, तरीही...", मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०० कोटींच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी जॅकलिनची ईडीकडून चौकशीही सुरू होती. आता ईडीने जॅकलिनची पोलखोल केली आहे. सुकेशच्या गैरव्यवहारांची जॅकलिनला संपूर्ण माहिती असल्याचा दावा ईडीने केला आहे. 

मनी लॉड्रिंग प्रकरणात दाखल केलेला FIR रद्द करण्यासाठी जॅकलिनने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उत्तर देताना ईडीने उच्च न्यायालयात जॅकलिनला सुकेशच्या गैरव्यवहाराप्रकरणी माहिती असल्याचा दावा केला आहे. जॅकलिनला सगळं माहीत असूनही ती सुकेशकडून पैसे घेत असल्याचं ईडीने म्हटलं आहे. सुकेशने गैरव्यवहारातून मिळवलेल्या पैशांचा जॅकलिनने उपभोग घेतल्याचंही ईडीने सांगितलं आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिलला होणार आहे. 

ईडीने काय म्हटलं?

जॅकलिनने सुकेशबरोबर केलेल्या व्यवहारांचा कधीच खुलासा केला नाही. जोपर्यंत जॅकलिनविरोधात पुरावे मिळाले नव्हते. तोपर्यंत तिने हे काम सुरूच ठेवलं होतं. तिने या गोष्टी लपवून ठेवल्या. त्याबरोबरच सुकेशकडून मिळणाऱ्या महागड्या वस्तूंचाही ती उपभोग घेत होती. तिने हे मुद्दाम केलं आहे. 

२०० कोटी मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपी ठरलेल्या सुकेश चंद्रशेखरबरोबर जॅकलिन फर्नांडिसचे प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं. जॅकलिनला त्याने अनेक महागड्या गोष्टी भेट म्हणून दिल्या होत्या. त्या दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. या प्रकरणात नोरा फतेहीचं नावही समोर आलं होतं. 

Web Title: Jacqueline Fernandez know everything about sukesh chandrashekhar 200cr money laundring case said ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.