​‘रेस3’च्या सेटवर जॅकलिन फर्नांडिस जखमी, डोळ्याला गंभीर इजा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:34 IST2018-03-23T10:04:05+5:302018-03-23T15:34:05+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, सध्या अबूधाबीमध्ये असलेली जॅकलिन गंभीर जखमी झाल्याचे वृत्त ...

Jacqueline Fernandez injured in a set of 'Res3', serious injury to the eye !! | ​‘रेस3’च्या सेटवर जॅकलिन फर्नांडिस जखमी, डोळ्याला गंभीर इजा!!

​‘रेस3’च्या सेटवर जॅकलिन फर्नांडिस जखमी, डोळ्याला गंभीर इजा!!

रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, सध्या अबूधाबीमध्ये असलेली जॅकलिन गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तिच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे कळतेय.
अबुधाबीमध्ये ‘रेस3’चे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॅकलिन जखमी झाली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, शूटींगदरम्यानच्या फावल्या वेळात जॅक स्क्वॅश खेळत होती. यावेळी बॉल थेट तिच्या डोळ्यावर येऊन आदळला. तो इतक्या जोरात आदळला की, जॅकच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. यानंतर लगेच तिला रूग्णालयात हलवण्यात आली. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. उद्या पुण्यात ‘दा-दबंग’ टुरसाठी जॅक उपस्थित राहणार होती. सलमान खान आणि डेली शाह या दोघांसोबत ती परतणार होती. मात्र त्यापूर्वीच तिच्या डोळ्यांला गंभीर इजा झाली.
  जॅकलिनला स्क्वॅश हा खेळ अतिशय आवडतो. गेल्या काही दिवसांतील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरचे फोटो पाहिले असता तिचे ‘स्क्वॅश’ प्रेम दिसून येते. हाच गेम खेळताना आपण गंभीर जखमी होऊन असे जॅकला स्वप्नातही वाटले नसेल. आता केवळ या दुखापतीतून जॅक लवकर बरी व्हावी, अशी आशा करूयात. 
‘रेस3’ या चित्रपटात जॅक सलमान खानसोबत दिसणार आहे. गत सोमवारीच या चित्रपटातील जॅकलिनचा फर्स्ट लूक समोर आला होता. यात ती अतिशय डॅशिंग अंदाजात बघायला मिळाली होती.  काळ्या रंगाचा व्ही शेप टॉप, हाफ क्लच  हेअरस्टाइल आणि हातात गन असा तिचा अंदाज होता.
या चित्रपटात सलमान व जॅकलिनशिवाय बॉबी देओल, साकिब सलीम, डेजी शाह मुख्य भूमिकेत आहेत.  सोनाक्षी सिन्हाही यात कॅमिओ रोलमध्ये दिसेल.‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

ALSO READ : सलमान खानच्या डॅशिंग अंदाजानंतर जॅकलीन फर्नांडिसनेही केली हवा!

Web Title: Jacqueline Fernandez injured in a set of 'Res3', serious injury to the eye !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.