पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार जॅकलिन फर्नांडिस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:47 IST2017-08-23T11:17:02+5:302017-08-23T16:47:02+5:30

सलमान खानचा ट्यूबलाइट चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर आपटला असेल मात्र तरीही त्याच्याकडे कामाची काही कमी नाही आहे. एकनंतर एक ...

Jacqueline Fernandes to be seen again with Salman Khan | पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार जॅकलिन फर्नांडिस !

पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार जॅकलिन फर्नांडिस !

मान खानचा ट्यूबलाइट चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर आपटला असेल मात्र तरीही त्याच्याकडे कामाची काही कमी नाही आहे. एकनंतर एक अनेक चित्रपट सलमान खान साईन करत चालला आहे. आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते 'रेस 3' मध्ये सैफ अली खानचा पत्त कट होऊन त्याजागी सलमान खानला घेण्यात आले आहे. याचित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. सलमानसोबत जॅकलिनचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी जॅकलीन सलमानसोबत किक चित्रपटात दिसली होती. सलमानकडून याचित्रपटाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जॅकलिन एका इंटरव्ह्युमध्ये म्हणाली सध्या ती अ जेंटलमॅनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती जुडवा 2 च्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. जुडवा 2नंतर ती सुशांत सिंग राजपूतसह ड्रायव्ह चित्रपटात दिसणार आहे. हे सगळे संपल्यानंतर ती सलमान खानसोबत 'रेस 3' मध्ये काम करणार आहे.  

याआधीच्या रेस चित्रपटाच्या सीरिजमध्ये सैफ अली खान दिसला होता. मात्र त्याला आता सलमान खानने रिप्लेस  केले आहे. सलमान खान यात जॅकलिनसोबत रोमांस करताना दिसणार आहेत. रेसच्या सीरिजचे दिग्दर्शन याआधी अब्बास मस्तान यांनी केले होते यावेळसी मात्र ते रेमो डिसुझा करणार आहे. सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट टायगर जिंदा हैच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार आहेत. ख्रिसमला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एक था टायगर है चा सीक्वल आहे. 

Web Title: Jacqueline Fernandes to be seen again with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.