जॅकीला चिंता पोराची
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 17:43 IST2016-04-12T00:43:34+5:302016-04-11T17:43:34+5:30
जॅकी म्हणजे, आपला जॅकी श्रॉफ हो. आता जॅकीला पोराची कसली चिंता, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण जॅकी खरोखरंच ...

जॅकीला चिंता पोराची
ज की म्हणजे, आपला जॅकी श्रॉफ हो. आता जॅकीला पोराची कसली चिंता, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण जॅकी खरोखरंच टायगरची चिंता करतो. खुद्द टायगरनेच याची कबुली दिली. माझे डॅडी सतत माझी चिंता करतात. मला प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया मिळेल, याबद्दल माझ्यापेक्षा ते अधिक चिंतीत असतात. प्रेक्षक मला स्वीकारतील की नाही,याची त्यांना सतत काळजी वाटत असते, असे टायगरने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले. माझे डॅडी म्हणजे एक प्रतिभावान, महान अभिनेते आहे. एका महान अभिनेत्याचा मुलगा म्हणून माझ्याकडून माझ्या चाहत्यांना अपेक्षा आहेत. याचा माझ्यावर दबाव आहेच. डॅडी हे सगळ समजून आहे, त्यामुळेच त्यांना माझी काळजी वाटते. प्रत्येक मोठ्या अभिनेत्याच्या मुलांना दबाव सहन करावा लागतो. माझ्या माता-पित्याला माझा अभिमान वाटावा, यासाठी मी मेहनत घेतोय. हेच माझे लक्ष्यही आहे. डॅडींना माझ्या आगामी चित्रपट ‘बागी’चा ट्रेलर आवडला आहे. ते आनंदी आहेत. ते बोलून दाखवत नाहीत,पण मला माहितीयं, ते आनंदात आहे, असेही टायगरने सांगितले.
‘बागी’ या चित्रपटातसाठी टायगरने चीफ कमांडो प्रशिक्षक गँ्रडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्याकडून केरळची प्राचीन मार्शन आर्ट कला कलरीपायट्टू शिकली आहे.
‘बागी’ या चित्रपटातसाठी टायगरने चीफ कमांडो प्रशिक्षक गँ्रडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्याकडून केरळची प्राचीन मार्शन आर्ट कला कलरीपायट्टू शिकली आहे.