लेकाच्या फ्लॉप चित्रपटांबाबत जग्गूदादा स्पष्टच बोलले, म्हणाले, "टायगर ॲक्शन स्टार पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:25 PM2023-12-12T12:25:11+5:302023-12-12T12:25:49+5:30

एकामागोमाग एक 'मुन्ना मायकल', 'हिरोपंती २', 'गणपथ' या टायगरच्या फ्लॉप चित्रपटांबाबत आता जॅकी श्रॉफ यांनी भाष्य केलं आहे. 

jackie shroff talk about flop movie of son tiger shroff said he need good technician | लेकाच्या फ्लॉप चित्रपटांबाबत जग्गूदादा स्पष्टच बोलले, म्हणाले, "टायगर ॲक्शन स्टार पण..."

लेकाच्या फ्लॉप चित्रपटांबाबत जग्गूदादा स्पष्टच बोलले, म्हणाले, "टायगर ॲक्शन स्टार पण..."

बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. २०१४ साली टायगरने 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 'बाघी', 'बाघी २', 'वॉर' अशा सुपरहिट चित्रपटांत टायगरने काम केलं. पण, त्याच्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावं तितकं यश मिळालं नाही. टायगरचे मागील काही सिनेमे फ्लॉप ठरले. एकामागोमाग एक 'मुन्ना मायकल', 'हिरोपंती २', 'गणपथ' या टायगरच्या फ्लॉप चित्रपटांबाबत आता जॅकी श्रॉफ यांनी भाष्य केलं आहे. 

लेकाच्या फ्लॉप चित्रपटांबाबत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, "हिट आणि फ्लॉप हा इंडस्ट्रीचा भाग आहे. मला वाटतं टायगरला चांगले चित्रपट आणि चांगल्या टेक्निशियनची गरज आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे. तो एक ॲक्शन स्टार आहे. काही चित्रपट चालतात, काही नाही चालत. हेच आयुष्य आहे. मी २५० चित्रपट केले आणि ते सगळेच सुपरहिट झाले असं नाही. हे एक टीम वर्क आहे आणि चित्रपट टीमवरच अवलंबून असतो. आयुष्य आनंदात जगा." 

या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या करिअरबाबतही भाष्य म्हणाले. "आयुष्यात कोणालाच हवं ते सगळं मिळत नाही. ते शक्यही नाही. त्यामुळे आरोग्य, कुटुंब आणि मित्र महत्त्वाचे आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असलं पाहिजे. मी शेंगदाणे विकतानाही आनंदी असायचो. त्यानंतर भिंतींवर स्टिकर लावताना, ट्रॅव्हल एजन्सीबरोबर काम करताना, मॉडेलिंग आणि चित्रपटांत अभिनय करतानाही मला मजा आली. आता मला झाडं लावताना आनंदी वाटते," असंही ते म्हणाले.  

पुढे ते म्हणाले, "मला जे काम मिळालं ते मी केलं. मी सुरुवातीला शेंगदाणे विकायचो. त्यानंतर भिंतींवर पोस्टर लावण्याचं काम मिळालं. मग, मी ट्रॅव्हल एजन्सीबरोबर काम केलं. तेव्हाच मला कोणीतरी 'मॉडेलिंग करशील का?' असं विचारलं.जेव्हा मी ते केलं तेव्हा मला चित्रपटाची ऑफर मिळाली. मी तेही केलं. सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी स्वत:ला तयार ठेवलं होतं. मी प्रामाणिकपणे माझं काम केलं. मी कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही."

Web Title: jackie shroff talk about flop movie of son tiger shroff said he need good technician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.