रॉयल एनफील्ड गाडीवरून मुंबईच्या रस्त्यांवर सुसाट धावला जग्गू दादा, मोजावे लागले इतके लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:35 IST2019-11-28T15:35:18+5:302019-11-28T15:35:32+5:30
या बाईकची ऑनरोड किंमत 3.30 लाख रुपये आहे.

रॉयल एनफील्ड गाडीवरून मुंबईच्या रस्त्यांवर सुसाट धावला जग्गू दादा, मोजावे लागले इतके लाख
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांचे बाइक प्रेम वेळोवेळी समोर आले आहे. यात आता आणखीन एका अभिनेत्याचे बाईक प्रेम समोर आले आहे. तो अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर जग्गू दादाने नवीन घेतलेल्या बाईक राईडचा आनंद लुटला. ब-याच दिवसांनंतर जग्गू दादा अशा प्रकारे आनंद लुटताना पाहायला मिळाला. शूटिंगमधू मिळालेल्या वेळेचा अशाप्रकारे सदुपयोग करण्याचा आनंद हा निराळाच असतो असेही जग्गू दादाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. या बाईकची ऑनरोड किंमत 3.30 लाख रुपये आहे.
विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ लोकप्रिय अभिनेता असला तरी सेलिब्रेटी असल्याचा आव आणत नाही. अगदी सर्वसामान्य आयुष्य जगायला जग्गु दादाला आवडते. आजही जग्गु दादा त्याच्या चाळीतल्या घरी जातो. याविषयी अनेकदा मुलाखतीत सांगत असतात.
''मी तिथे बरेच वर्षे राहिलेलो आहे. हिरो बनल्यानंतरही राहिलो आहे. टॉयलेटला जाण्यासाठी रांग लावायला लागायची. निर्माते येऊन बसत होते आणि मी बोलायचो बाथरूमला जाऊन येतो. टॉयलेट बाहेर होते. त्यामुळे लाईन लागत होती. तीस लोक होते आणि सात खोल्या होत्या. सात खोल्या पार करून जावं लागत होतं. जेव्हा तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते जीवन व्यतित केलं आहे. मग काय झालं. मी विचार केला नव्हता की चाळीत राहून डब्बा पकडून मी हिरो बनेन''. एकुणच काय तर जॅकी श्रॉफ आपले जुने दिवस आजही विसरलेला नसून त्याच आठवणीत रमतो.