अन् विमानतळावर अडकली जॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 18:11 IST2016-09-20T12:41:20+5:302016-09-20T18:11:20+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस अलीकडे मुंबई विमानतळावर अडकून बसली. त्याचे झाले असे की, जॅकलीन न्यूयॉर्कवरून निघाली आणि मुंबई विमानळावर ...

अन् विमानतळावर अडकली जॅक!
श रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस अलीकडे मुंबई विमानतळावर अडकून बसली. त्याचे झाले असे की, जॅकलीन न्यूयॉर्कवरून निघाली आणि मुंबई विमानळावर उतरली. आता जॅकचे विमान मुंबईत लँड होण्यापूर्वी तिच्या ड्रायव्हरने विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. पण ड्रायव्हर नेमका ट्रॅफिक जाममध्ये अडकला. मग काय, जॅकचा चांगलाच नाईलाज झाला. एका कॉफी शॉपमध्ये जॅकला ड्रायव्हरची प्रतीक्षा करावी लागली. आता कॉफी शॉपमध्ये जॅकलीन म्हटल्यावर लोकांची गर्दी जमणारच. पण जॅकलिनला या प्रसंगाला तोंड द्यावेच लागले. ड्रायव्हर आला तेव्हा कुठे तिची सुटका झाली.