​जॅक-कॅट म्हणतात, आमच्यात सगळं काही ‘आॅल वेल’??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 19:37 IST2016-08-27T14:07:43+5:302016-08-27T19:37:43+5:30

कॅटरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात सगळेकाही ‘आॅल वेल’ नसल्याचे अलीकडे‘झलक दिखला जा’च्या सेटवर दिसले. एकीकडे कॅट या शोमध्ये ...

Jack-Cat says, 'All Well'? | ​जॅक-कॅट म्हणतात, आमच्यात सगळं काही ‘आॅल वेल’??

​जॅक-कॅट म्हणतात, आमच्यात सगळं काही ‘आॅल वेल’??

टरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात सगळेकाही ‘आॅल वेल’ नसल्याचे अलीकडे‘झलक दिखला जा’च्या सेटवर दिसले. एकीकडे कॅट या शोमध्ये प्रमोशनसाठी आली. पण जजच्या खुर्चीवर बसलेल्या जॅककडे तिने साफ दुर्लक्ष केले. दुसरीकडे शोमधील एक कंटेस्टंट नोरा हिच्या डान्सिंग स्टाईलवर कमेंट करताना जॅक कॅटला डिवचतांना दिसली. दोघींमधील या ‘कॅट फाईट’ची बातमी बॉलिवूडमध्ये वाºयासारखी पसरली नसेल तर नवल. अर्थात खुद्द कॅट व जॅक दोघींनीही या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. जॅकला याबाबत विचारल्याने तिने या वृत्ताचा इन्कार केला. कॅट व माझ्यात कुठलीही ‘फाईट’ नाही. मला कॅट आवडते. ‘झलक’च्या सेटवरही काहीही घडलेले नाही, असे तिने स्पष्ट केले. कॅटनेही जॅकसारखीच ही बातमी उधळून लावली. एकंदर काय तर आमच्यात सगळे काही ‘आॅल वेल’ आहे, असेच कॅट-जॅकने स्पष्ट केले. आता कॅटरिना व जॅकलिन दोघीही त्यांच्यात सगळे काही ‘आॅल वेल’ असल्याचे सांगत असतील तर आपणही ते मानायलाच हवे. होय ना!!

Web Title: Jack-Cat says, 'All Well'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.