"३२ वर्षांपूर्वी नाव, पैसा आणि पॉवरच्या जोरावर...", कुमार सानू यांच्या Ex पत्नीनंतर त्यांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:43 IST2025-09-23T16:41:49+5:302025-09-23T16:43:04+5:30
कुमार सानू यांच्या ex पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांचा मुलगा जान सानू यानेदेखील आईची बाजू घेत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.

"३२ वर्षांपूर्वी नाव, पैसा आणि पॉवरच्या जोरावर...", कुमार सानू यांच्या Ex पत्नीनंतर त्यांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड सिंगर कुमार सानू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. कुमार सानू यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल कुनिका सदानंदने उघडपणे भाष्य केलं. त्यानंतर कुमार सानू यांच्या ex पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांचा मुलगा जान सानू यानेदेखील आईची बाजू घेत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
जान कुमार सानूने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, "३२ वर्षांपूर्वी नाव, पैसा आणि पॉवरच्या जोरावर गप्प बसवलं गेलं होतं. आज मी ३१ वर्षांचा आहे. तुम्हाला कळालंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे. मी माझ्या स्टोरीमध्ये काही लिंक शेअर करत आहे. त्या तुम्ही बघा मग आपण बोलू", असं त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. स्टोरीमध्ये जान सानूने त्याच्या आईच्या मुलाखतीच्या लिंक शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी कुमार सानूंवर आरोप केले आहेत.
कुमार सानू यांची एक्स पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी सांगितलं की त्या प्रेग्नंट असतानाच कुमार सानू यांनी त्यांना घटस्फोटासाठी कोर्टात खेचलं होतं. "कुमार सानू यांनी मला घरात कोंडून ठेवलं होतं. मला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. मुलांसोबत मी वेगळ्या रुममध्ये राहायचे. मला जेवणही दिलं जायचं नाही. प्रेग्नन्सीमध्ये मला टॉर्चर केलं गेलं. मी काहीच करू शकत नव्हते कारण मी प्रेग्नंट होते", असं त्या म्हणाल्या होत्या