It's shocking! ‘या’ मुलीसाठी टायगर श्रॉफ सोडणार आई-वडिलांचे घर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:11 IST2017-09-26T07:41:04+5:302017-09-26T13:11:04+5:30
टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या दोघांचे रिलेशन आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. हे दोघे रिलेशनशिपमध्ये अडकले त्याला बरीच ...
.jpg)
It's shocking! ‘या’ मुलीसाठी टायगर श्रॉफ सोडणार आई-वडिलांचे घर!!
ट यगर श्रॉफ आणि दिशा पटनी या दोघांचे रिलेशन आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. हे दोघे रिलेशनशिपमध्ये अडकले त्याला बरीच वर्षे झाली आणि या काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. अर्थात टायगर व दिशाने आपले नाते कधीच कबुल केले नाही. पण दोघांचेही कुटुंब आणि जवळच्या मित्रांना टायगर व दिशामध्ये रूजत असलेल्या नात्याची चांगलीच कल्पना आहे. सध्या या बॉलिवूड कपलबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, ही बातमी बघता टायगर व दिशा दोघांनीही कदाचित आता आपले नाते जगापुढे मान्य करण्याचा निर्णय घेतला असावा, असे वाटतेय.
![]()
डीएनएच्या बातमीनुसार, टायगर व दिशा दोघांनीही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिशाने अलीकडेच वांद्रयात एक फ्लॅट घेतला आहे. ती या फ्लॅटमध्ये शिफ्टही झालीय. हा फ्लॅट घेण्याआधी तिने टायगरचा सल्ला घेतला होता. केवळ सल्लाच नाही तर काहींच्या मते, टायगर व दिशा या दोघांनी मिळून हा फ्लॅट खरेदी केला आहे. लवकर टायगरही दिशासोबत या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास एकप्रकारे दोघांच्याही नात्यावर एकप्रकारची मोहोर लागणार आहे. तसे पाहता,बॉलिवूडमध्ये लिव्ह-इन नवे नाही. आधीही इंडस्ट्रीतील अनेक कपल लिव्ह-इनमध्ये राहिले आहेत. काही आत्ताही राहत आहेत. टायगर व दिशा यात केवळ भर घालणार आहेत.
ALSO READ : ‘बागी2’साठी टायगर श्रॉफ करणार असे काही की, जाणून तुम्हालाही बसेल धक्का!
दिशा व टायगर दोघेही लवकरच ‘बागी2’मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटींग अलीकडेच सुरू झाले. ‘बागी2’हा चित्रपट अहमद खान दिग्दर्शित करतोय. २००६ मध्ये आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्येही टायगर हाच लीड रोलमध्ये होता. त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’मध्ये मात्र श्रद्धा ऐवजी टायगरची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हिची वर्णी लागलीे. प्रतीक बब्बर हा सुद्धा या चित्रपटात एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी ‘बेफिकरा’ या गाण्यात दोघांची हॉट केमिस्ट्री दिसली होती. आता ‘बागी2’मध्ये पुन्हा या लव्हबर्ड्सची हॉट केमिस्ट्री रंगणार आहे. ‘बागी2’शिवाय टायगर ‘रॅम्बो’या हॉलिवूडपटाच्या आॅफिशिअल रिमेकमध्येही बिझी आहे.