It's Shocking : दिशासोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच बोला टायगर श्रॉफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:36 IST2017-07-21T11:54:02+5:302018-04-03T14:36:42+5:30
चित्रपटगृहात आजचा टायगर श्रॉफचा मुन्ना मायकल चित्रपट रिलीज झाला. टायगरचे फॅन्स त्याच्या हा चित्रपट पाहाण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. यानंतर ...

It's Shocking : दिशासोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच बोला टायगर श्रॉफ!
च त्रपटगृहात आजचा टायगर श्रॉफचा मुन्ना मायकल चित्रपट रिलीज झाला. टायगरचे फॅन्स त्याच्या हा चित्रपट पाहाण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. यानंतर टायगर त्याचा आगामी चित्रपट बागी2च्या तयारीला लागणार आहे. या चित्रपटातील भूमिकेत फिट बसण्यासाठी टायगर जीममध्ये जाऊन वर्कआऊट करताना दिसतो आहे. बागी-2मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर नाही तर त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी दिसणार आहे. बागी2 हा बागीचा सीक्वल आहे. या सीक्वलसाठी निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि हा नवा चेहरा या चित्रपटासाठी दिशा पटानीशिवाय कोणाचा असूच शकत नाही. यात दिशा आणि टायगरला एकत्र बघण्यास त्यांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत. आपल्या कथित गर्लफ्रेंडसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी टायगर देखील उत्साही आहे. या दोघांची केमिस्ट्री आपण याआधी बेफिकरा म्युझिक व्हिडीओमध्ये बघितली आहे. आता पुन्हा एकदा टायगर आणि दिशाची जोडी बागी2 मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.
SEE PICS : दुखापतग्रस्त दिशा पटानीला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची साथ!
बॉलिवूड लाईफल्या दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये टायगर म्हणाला, ''मी दिशासोबत काम करण्यास खूपच उत्सुक आहे. कारण मी तिच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल फील करतो. आमच्या दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली आहे म्हणून तिच्यासोबत काम करताना मजा येते.'' टायगरला त्याच्या आणि दिशाच्या नात्यावरुन रोज होणाऱ्या चर्चेमुळे तुला प्रोब्लेम नाही होत का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर तो म्हणाला, ''नाही यामुळे मला काहीच प्रोब्लेम होत नाही. हा प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येकाला यातून जावचं लागते. मला यामुळे काहीच फरक नाही पडत.'' बागी2 चे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंगदेखील सुरु होणार आहे.