It's amazing :पाहा, रणवीर सिंहचा ‘पद्मावती’ अवतार !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 17:23 IST2017-01-22T11:53:39+5:302017-01-22T17:23:39+5:30

बॉलिवूडचा ‘बेफिक्रे बॅचलर’ रणवीर सिंह लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा  राणी पद्मावतीच्या ...

It's amazing: Look, Ranveer Singh's 'Padmavati' incarnation !! | It's amazing :पाहा, रणवीर सिंहचा ‘पद्मावती’ अवतार !!

It's amazing :पाहा, रणवीर सिंहचा ‘पद्मावती’ अवतार !!

लिवूडचा ‘बेफिक्रे बॅचलर’ रणवीर सिंह लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा  राणी पद्मावतीच्या सौंदर्याने मोहित झालेल्या अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. अलाउद्दीन खिल्जी हा दिल्लीवर राज्य करणा-या खिल्जी घराण्यातला दुसरा सुलतान होता.  निश्चितपणे ‘बाजीराव मस्तानी’नंतर भन्साळींचा ‘पद्मावती’ पाहण्यास आपल्यापैकी सर्वचजण उत्सूक आहोत.
 
 ‘पद्मावती’ या चित्रपटात रणवीर सिंहचा लूक कसा असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आम्ही मात्र या चित्रपटातील रणवीरचा लूक कसा असेल, हे सांगणार आहोत. अगदी तंतोतंत नाही. पण रणवीर अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत कसा दिसेल,  याचा अंदाज तुम्ही नक्की बांधू शकणार आहात. रणवीर अलीकडे एका अवार्ड सोहळ्यात दिसला. या अवार्ड् सोहळ्यात रणवीर एकदम ‘पद्मावती’ स्टाईलमध्ये पोहोचला. त्याला पाहून अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. ‘पद्मावती’मध्ये रणवीर अगदी हुबेहुब असाच दिसणार, असेच अनेकांना त्याच्याकडे पाहून वाचले. या सोहळ्यात रणवीर नेहमीप्रमाणे अतिशय आनंदी मूडमध्ये दिसला. येथे उपस्थित काही पोलिस कर्मचा-यांसोबत त्याने सेल्फीही काढला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाही रणवीर भेटला.





‘पद्मावती’त दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी तिस-यांदा एकत्र दिसणार आहे. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणा-या ‘पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरु आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाची अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे. दीपिका या चित्रपटात राजपूत राणी ‘पद्मावती’ची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेता शाहिद कपूर ‘पद्मावती’चा पती  राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटापूर्वी दीपिका-रणवीर ही जोडी संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ तसेच ‘बाजीराव मस्तानी’या चित्रपटात एकत्र दिसली होती. 

Related stories : असा असेल ‘पद्मावती’तील दीपिकाचा लूक!
​तो दीपिकाचा ‘पद्मावती’ लूक नव्हेच!
​रणवीर-दीपिकाने लपवले, ते विन डिझेलने सांगून टाकले!

Web Title: It's amazing: Look, Ranveer Singh's 'Padmavati' incarnation !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.