'ही' अभिनेत्री आयटम साँगमधून दाखवणार जलवा, या तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 07:15 AM2019-03-13T07:15:00+5:302019-03-13T07:15:00+5:30

सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात दिसणार आहे.

Item Song In Amhi Befikar Marathi Movie | 'ही' अभिनेत्री आयटम साँगमधून दाखवणार जलवा, या तारखेला होणार प्रदर्शित

'ही' अभिनेत्री आयटम साँगमधून दाखवणार जलवा, या तारखेला होणार प्रदर्शित

googlenewsNext

शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता 'रसगुल्लाबाई' प्रेक्षकांसमोर येत आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार आहे, प्रियंका झेमसेनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. प्रियांका झेमसेनं आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर व्हीजे म्हणून काम केलं आहे. तसंच वेब सीरिजही केल्या आहेत. आता रूपेरी पडद्यावर प्रियांका आयटम साँगमध्ये आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवणार आहे. आयटम साँगच्या निमित्तानेचॉप्सचं प्रियंकाचं सिनेसृष्ट्रीत पदार्पण होतंय .

मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, कॉलेजचे बेफिकिर आयुष्य हे सगळेच आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, 'आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. ' युथफूल विषय, उत्तम स्टारकास्ट, दमदार तांत्रिक बाजू असलेला "आम्ही बेफिकर" हा चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
 

Web Title: Item Song In Amhi Befikar Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.