It's conform फन्ने खानमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत दिसणार 'हा' अभिनेता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 14:55 IST2017-09-01T09:25:35+5:302017-09-01T14:55:35+5:30

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी ओळखला जातो. आता त्याला ऐश्वर्या रायबच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली ...

It will be conformed to Fan Khan in 'Haa' Actor with Aishwarya Rai Bachchan! | It's conform फन्ने खानमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत दिसणार 'हा' अभिनेता !

It's conform फन्ने खानमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत दिसणार 'हा' अभिनेता !

लिवूड अभिनेता राजकुमार राव हा नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी ओळखला जातो. आता त्याला ऐश्वर्या रायबच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या राजकुमार राव सातव्या आसमानवर आहे. नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट बरेली की बर्फी दोन आठवड्यानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवतो आहे तसेच लवकरच तो ऐश्वर्यासोबत स्क्रिनसुद्धा शेअर करणार आहे.    

ALSO READ : एका जाहिरातीने बदलले राजकुमार रावचे नशीब!


चित्रपट 'फन्ने खान'मध्ये राजकुमार राव, ऐश्वर्या राय एकत्र दिसणार आहेत. आधी अशी चर्चा होती की याचित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट आर माधवन दिसणार आहे. मात्र आता अधिकृतपणे राजकुमार रावच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या राजकुमार राव वेबसीरिज 'बोस'च्या शूटिंगसाठी पोलंडला आहे. याचदरम्यान निर्मिती प्रेरणा अरोराने त्याला हि माहिती दिली आहे. फन्ने खानमध्ये ऐश्वर्याची आपल्यापेक्षा वयाने 10 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत जोडी जमणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात याचित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. 2000 मध्ये आलेल्या एव्हरीबॉडी फेमस या हॉलिवूड चित्रपटाचे हिंदी रिमेक असणार आहे. हा एक म्युझिकल चित्रपट असणार आहे. यात अनिल कपूर ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर यांची जोडी सुभाष घई यांची ताल चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर ते दोघे 'हमारा दिल आपके पास है' याचित्रपटात दिसले होते. हा चित्रपट एप्रिल 2018मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक वर्षांनंतर दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटातची वाट नक्कीच आतुरतेने बघत असतील यात काही शंका नाही. 

Web Title: It will be conformed to Fan Khan in 'Haa' Actor with Aishwarya Rai Bachchan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.