उपद्रवी चाहत्यांच्या गराड्यातून ‘या’ अभिनेत्रीला सुटका करणे झाले होते मुश्किल, मग काहीसे असे घडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:05 IST2017-09-28T10:35:52+5:302017-09-28T16:05:52+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘मुबारकां’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नेहा शर्मा हिला गेल्या मंगळवारी अतिशय कटू अनुभवाचा सामना ...

उपद्रवी चाहत्यांच्या गराड्यातून ‘या’ अभिनेत्रीला सुटका करणे झाले होते मुश्किल, मग काहीसे असे घडले!
ग ल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘मुबारकां’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नेहा शर्मा हिला गेल्या मंगळवारी अतिशय कटू अनुभवाचा सामना करावा लागला. होय, नेहा रेस्टॉरंटच्या बाहेर निघाल्यानंतर तिला काही उपद्रवी चाहत्यांनी घेरले होते; अशात तिला बाहेर पडणे मुश्किल झाले होते. सुरुवातीला चाहत्यांकडून सेल्फी घेण्याचा अट्टाहास केला जात होता. मात्र काही क्षणांनंतरच हा जमाव असा काही पेटला की, त्यातून तिला बाहेर पडणे मुश्किल झाले होते. वास्तविक नेहाने सुरुवातीला तिच्या काही चाहत्यांचा सेल्फीचा अट्टाहास पूर्णही केला. परंतु जेव्हा तिला चहूबाजूने लोकांनी घेरले होते, तेव्हा तिची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार यांनी लोकांना बाजूला सारत तिची सुटका केली.
बिजॉय नाम्बियार हेदेखील त्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आले होते. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, नेहाला काही लोकांनी घेरले आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच नेहाकडे धाव घेतली. लोकांना बाजूला सारत त्यांनी नेहाचा हात पकडून तिला जमावातून बाहेर काढले. तिला कारमध्ये बसून दिल्यानंतर बिजॉयदेखील तेथून रवाना झाले. काही दिवसांपूर्वीच ‘जुडवा-२’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी जॅकलीन फर्नांडिस चाहत्यांच्या गराड्यात अशीच फसली होती. त्यानंतर वरूण धवन धाव घेत जॅकलीन बाहेर काढले होते.
![]()
बिहारमधील भागलपूर शहरात जन्मलेली नेहा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान पक्के करण्यासाठी धडपड करीत आहे. २९ वर्षीय नेहाने दिल्लीच्या एनआयआयएफटी कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगची पद्वी घेतली. नेहाचे वडील भागलपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. नेहाने तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली नेहा अजूनही दमदार भूमिकेच्या शोधात आहे.