"गाण्यातला भाव समजणे महत्त्वाचे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 12:42 IST2017-05-22T12:16:33+5:302017-05-25T12:42:45+5:30
तुझा पल हा अल्बम खूपच गाजला त्याबद्दल काय सांगशील ? मी दिल्लीवरुन येताना एक अल्बम करायचे डोक्यात ठेवून आलो ...

"गाण्यातला भाव समजणे महत्त्वाचे"
मी दिल्लीवरुन येताना एक अल्बम करायचे डोक्यात ठेवून आलो होता. पल हा अल्बम मला माझे स्वप्नपूर्ण झाल्यासारखे वाटत होते. खूप वर्षांचे माझे स्वप्न पूर्ण झाले. यारो दोस्ती बडी ही हसीन है, याद आयेंगे ये पल हे गाण आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. जेवढे माझे चित्रपटातली गाणी हिट आहेत. तेवढीच माझी ही दोन्ही गाणीसुद्धा लोकप्रिय आहेत. फेंड्शीप डेला, फेअरवेलच्या ठिकाणी आजही ही गाणी आवर्जून ऐकू येतात.
तुझे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते, मग तो सिंगर कसा झालास ?
लहानपणी आपली खूप स्वप्न असतात त्यापैकीच एक माझे डॉक्टर व्हायचे होते. माझ्या लहानपणी एक डॉक्टर काका याचे जे आम्हाला बरं नसताना औषध देऊन जायचे. त्यांना बघून मला नेहमी असे वाटायचे काय मस्त काम करतात हे त्यांना बघून मला लहानपणी वाटायचे की मी पण डॉक्टर बनेन. मोठ्या गेल्यावर कळले की यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते हे काही आपल्याला जमणार नाही. (हसून) शाळेत असताना एकदा गाणे गायले आणि माझे गाणे संपताच लोकांच्या टाळ्यांचा गडगडाट झाला. माझ्या शिक्षकांना येऊन माझे कौतुक केले. यानंतर मी अनेक स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात मला बक्षिसे मिळत गेली आणि इथून खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरु झाला.
तडप तडप के हे गाणे तुझ्या करिअरचे टर्निंग पाईंट ठरले का ?
या गाण्याने मला घराघरात पोहोचवले. 1999 हे साल माझ्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. हम दिल दे चुके सनममधील यागाण्याने माझ्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हे गाण्याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. हे गाणे प्रदर्शित झाल्यावर जेव्हा मला लोक भेटायची तेव्हा त्यांचे रिअॅक्शन काहीस असे असायचे अरे तू तर खूप तरुण आहेस मग तुझ्या आवाजात एवढे इमोशन कुठून आले. मला वाटते गाण्याला कधी तुमच्या वयाची मर्यादा नसते एकदा तुम्ही त्याला आपले म्हटले की मग ते तुमचे होते. या गाण्यानंतर मला अनेक गाण्यांच्या ऑफर्स मिळाल्या.
जवळपास 20 वर्ष तुला या म्युझिक इंडस्ट्री पूर्ण झाली आहेत, आजच्या संगीतात का बद्दल झाल्याचे तुला जाणवते ?
खूप संगीतकार तरुण मुले आहेत. आजकाल स्पर्धा ही तेवढीच वाढली आहे. आपल्या देशात टॅलेंडची काहीच कमी नाही आहे. खूप वेगवेगळे आवाज आपल्या सतत कानावर पडता येत. गाण्याच्या तंत्रज्ञानात बरेच विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे बराच वेळा वाचतो. मात्र गायकाने यावर खूप अवलंबून राहु नये. कारण याचा उपयोग गायकाला यकाला लाईव्ह गाताना होत नाही. यामुळे फक्त तुमचा स्पीड वाढला आहे. काम लवकर होतात. स्टुडिओत जाऊन 40 मिनिटात तुम्हाला या नव्या तंत्रज्ञानामुळे गाणे रेकॉर्ड करणे सोपे झाले आहे.
रिअॅलिटी शोज बद्दल तुझे मत काय आहे ?
मी जास्त रिअॅलिटी शोज बघत नाही. या रिअॅलिटी शोमधून अनेक कलाकारांना आपली सादर करण्याचा प्लेटफॉर्म मिळतो. परीक्षक त्यांच्यातील स्पार्क बघून त्यावर महेनत घेऊऩ त्यांना प्रेक्षकांपर्यंत आणतात. त्यामुळे अनेक वेगळे आवाज देखील इंडस्ट्रीला मिळाले आहेत. जेवढे जास्त सिंगर तेवढी व्हेरायटी मिळते ऐकायला.
सध्या यूट्यूबर सिंगल साँगचा ट्रेंड चालू आहे. केके आम्हाला सिंगल साँग गाताना दिसणार आहे का ?
गेल्या काही दिवसापांसून मी सिंगल्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात जास्त कठिण सिंगल्स करणेच असते. आधी अल्बममध्ये 7 ते 8 गाणी असायची आता सिंगल्समध्ये असे होत नाही. माझे दोन तीन सिंगल्स साँग कच्चे पक्के तयार आहेत.