It happened one night : ​राजेश खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’च्या रिमेकचा फर्स्ट लूक आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 11:10 IST2017-06-30T05:40:00+5:302017-06-30T11:10:00+5:30

सिद्धार्थ मल्होत्राचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट दणकून आपटला. पण आता सिद्धार्थ पुन्हा लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

It happened one night: First look of the remake of Rajesh Khanna starrer 'Ittefaq' | It happened one night : ​राजेश खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’च्या रिमेकचा फर्स्ट लूक आला!

It happened one night : ​राजेश खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’च्या रिमेकचा फर्स्ट लूक आला!

द्धार्थ मल्होत्राचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट दणकून आपटला. पण आता सिद्धार्थ पुन्हा लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, यावेळी सिद्धार्थचे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन चित्रपट बॉक्सआॅफिसवर धम्माल करणार आहेत. अलीकडे सिद्धार्थने ‘अ जेंटलमॅन’ आणि ‘अय्यारी’ या त्याच्या दोन आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला होता. तोपर्यंत सिद्धार्थचा तिसरा चित्रपट म्हणजेच ‘इत्तेफाक’च्या रिमेकबद्दल फार चर्चा नव्हती. पण आज अचानक या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ‘इत्तेफाक’ च्या रिमेकचे नाव असणार आहे, ‘इट हॅपन्ड वन नाईट’. यात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे.
‘इट हॅपन्ड वन नाईट’  हा चित्रपट १९६९ साली आलेल्या राजेश खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात एक टिपिकल मर्डर मिस्ट्री होती. राजेश खन्नावर दोन हत्यांचा आरोप असतो. पण एकही हत्या त्याने केलेली नसते.  हीच मर्डर मिस्ट्री ‘इट हॅपन्ड वन नाईट’ मध्ये दिसणार आहे. शाहरूख खान याचा निर्माता आहे. शाहरूखने त्याच्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. यात सिद्धार्थ दिसतो आहे. त्याच्या हातात बेड्या आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटात सिद्धार्थसोबत सोनाक्षी सिन्हा हिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  या चित्रपटात एक प्रमोशनल सॉंग सोडले तर कुठलेही गाणे नसेल. ‘इट हॅपन्ड वन नाईट’ हे चित्रपटाचे नाव तुम्हाला याच नावाने आलेल्या एका हॉलिवूडपटाची आठवण करून देईल. पण दोन्ही चित्रपटांच्या कथा एकदम वेगळ्या आहेत. 

Web Title: It happened one night: First look of the remake of Rajesh Khanna starrer 'Ittefaq'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.