ईशा गुप्ताने केले पुन्हा हॉट फोटोशूट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:52 IST2017-11-08T16:22:48+5:302017-11-08T21:52:48+5:30

कदाचित तुम्हाला आठवत असेल की, अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस अगोदर सोशल मीडियावर ...

Isha secretly made Hot Photoshoot, see photos! | ईशा गुप्ताने केले पुन्हा हॉट फोटोशूट, पहा फोटो!

ईशा गुप्ताने केले पुन्हा हॉट फोटोशूट, पहा फोटो!

ाचित तुम्हाला आठवत असेल की, अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस अगोदर सोशल मीडियावर न्यूड फोटोज् शेअर करून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी सोशल मीडियावर ईशा गुप्तावर चौफेर टीकाही करण्यात आली. आता तिने पुन्हा एकदा असेच काहीसे फोटोशूट करून पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. होय, ईशाने जीक्यू मॅगझीनकरिता हे फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ईशा कमालीची हॉट दिसत आहे. कारण ईशाचे हे फोटो बघून कोणीही ते बघतच राहील असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

ईशाने या फोटोशूटचे दोन फोटो तिच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले. एका फोटोत ती निळ्या समुद्रकिनारी काळ्या बिकिनीमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीच मागे बघू नका, जोपर्यंत कॅमेरा तुम्हाला बोलवित नाही.’ दुसºया फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नोव्हेंबर सेज हॉलो’ या फोटोमध्ये ती कॅमेºयाकडे एकटक बघताना दिसत आहे. 


जीक्यू मॅगझीननेदेखील ईशाचा एक फोटो दोन दिवस अगोदरच इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. असो, जर तुम्ही असा विचार करीत असाल की, ईशा सातत्याने अशाप्रकारचे हॉट फोटो का शेअर करीत आहे? त्यात तिचा फायदा काय? तर याचे थोडक्यात उत्तर असे की, ईशाला तिच्या या बोल्डनेसमुळे इंडस्ट्रीत एक वेगळीच ओळख मिळाली असून, कित्येक जाहिरातींच्या आॅफर्सही तिला मिळत आहेत. 



काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली होती की, एका कंडोम ब्रॅण्डने तिला जाहिरातीच्या कॅम्पेनमध्ये अ‍ॅप्रोच होण्याची आॅफर दिली होती. या जाहिरातीत ती सनी लिओनीबरोबर झळकणार होती. परंतु ईशाने या जाहिरातीसाठी एक अट ठेवल्याने कंपनी व्यवस्थापन तिची ही अट पूर्ण करू शकली नाही. असो, ईशाच्या या फोटोमुळे नेहमीप्रमाणे आतादेखील सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चा रंगत आहे. काहींकडून तिचे कौतुक केले जात आहे, तर काही तिच्यावर टीकाही करीत आहेत. 

Web Title: Isha secretly made Hot Photoshoot, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.